शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

​आणखी एका माशाला ओबामांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 22:36 IST

हवाई येथील समुद्र किनारपट्टी जैववैविध्यतेच्या सुरक्षिततेसाठी राखीव म्हणून घोषित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे स्वागत म्हणून वैज्ञानिकांनी माशांच्या एका प्रजातीला त्यांचे नाव देण्याचे ठरवले आहे.

बराक ओबामा जर यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होत असले तरी ते मोठी लेगसी मागे सोडून जात आहेत. हवाई येथील समुद्र किनारपट्टी जैववैविध्यतेच्या सुरक्षिततेसाठी राखीव म्हणून घोषित करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे स्वागत म्हणून वैज्ञानिकांनी माशांच्या एका प्रजातीला त्यांचे नाव देण्याचे ठरवले आहे.‘कुरे अ‍ॅटोल’मधील पापाहॅनौमोकुआकिया प्रवाळ क्षेत्रात राहणाऱ्या दाट तपकिरी व सोनेरी रंगाचे हे मासे आहेत. विविध प्रकारचे सुमारे ७ हजार सजीव प्रजाती येथे राहतात. प्रवाळ, सागरीजीव आणि इतर मौल्यवान घटकांसाठी संरक्षित केलेल्या पापाहॅनौमोकुआकिया सागरी राष्ट्रीय स्मारकापेक्षा चौपट मोठे क्षेत्र संरक्षित करण्याचा ओबामांनी  निर्णय मागच्या आठवड्यात घेतला. १५ लाख चौ. किमीसह जगातील सर्वात मोठे संरक्षित सागरी क्षेत्र म्हणून ते आता ओळखले जाणार.या माशाच्या पाठीवर असणारा लाल व निळा ठिपका ओबामांच्या प्रचार मोहिमेच्या लोगोशी मिळता जुळता आहे. सागरी जीवशास्त्रज्ञ रिचर्ड पाईल यांनी सांगितले की, ओबामांच्या प्रचार मोहिमेच्या लोगोशी असलेले साधर्म्य केवळ योगायोग आहे. सागरी जीवनसृष्टीच्या संरक्षणासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही माशाच्या प्रजातीला त्यांचे नाव देत आहोत.बरं माशाच्या प्रजातीला ओबामांचे नाव देण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१२ साली टेनसी रिव्हर इथिओस्टोमा येथे सापडलेल्या माशालादेखील ओबामांचे नाव देण्यात आले होते.