तुरुगांत नव्हे हे तर हॉटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 04:51 IST
जेलप्रमाणेच हे हॉटेल बनविले आहे. येथील वेटर जेलर आणि कैद्याप्रमाणेच कपडे परिधान करुन तुमची आॅर्डर देतात.
तुरुगांत नव्हे हे तर हॉटेल
जर तुम्हाला खूप भूक लागली असतानाच शिक्षा सुनावली तर...? आणि या बदल्यात तुम्हाला चविष्ट जेवण ! ऐकायला हे खूपच आश्चर्यकारक असले तरी हे सत्य आहे. झारखंडच्या या आगळ्या-वेगळ्या लॉकअपची पद्धतच अशी आहे. झारखंडच्या हजारीबागमध्ये एक लॉकअप चर्चेत आहे. आम्ही येथे ख-या लॉकअपची चर्चा करत नाही, तर लॉकअप सारख्याच हॉटेलबद्दल बोलत आहोत. जेलप्रमाणेच हे हॉटेल बनविले आहे. येथील वेटर जेलर आणि कैद्याप्रमाणेच कपडे परिधान करुन तुमची आॅर्डर देतात.तुम्हाला येथे तुमचा टेबल मिळेल, पण सर्व टेबल हे बॅरकच्या आत असतील. यामुळे जेवणाची मजा ही जेलमध्ये घेतल्यासारखेच आहे. याची संकल्पना ही पॅरिसमधून घेतली आहे. जर तुम्ही छत्तीसगढला गेला तर एनएच 100 वर हजारीबागच्या लॉकअप हॉटेलमध्ये नक्की जेवण करा.