शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कधी कॅप शिवा कधी कोल्ड, कधी पेटल तर कधी बटरफ्लाय.. फॅशनच्या जगात बाह्यांच्या प्रकाराची कमतरता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 13:42 IST

जसं कॉलरमध्ये प्रचंड व्हरायटी आहे तशीच बाह्यांमध्येही तब्बल चाळीसच्या आसपास प्रकार आहेत. शिवाय क्रिएटीव्हीटीला अंत नसतो या न्यायानं या बाह्यांमध्ये अनेक नवनवे क्रिएटिव्ह प्रकारही खुद्द शिवणारा स्वत:च्या मनानं आणि स्वत:च्या कल्पकतेनं करू शकतो.

ठळक मुद्दे* खांद्याला केवळ एखाद्या कॅपप्रमाणे झाकणा-या कप बाह्या अत्यंत स्मार्ट दिसतात.* फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे दिसणा-या पेटल बाह्या आकर्षक पद्धतीनं शिवलेल्या असतात.

- मोहिनी घारपुरे-देशमुखफॅशनच्या जगात ड्रेसच्या बाह्यांनाही खूप महत्त्वं असतं. दरवेळेला जो ट्रेण्ड असतो त्यानुरूप आपण आपल्या ड्रेसच्या बाहया शिवून घेतो. कधी क्रिसक्रॉस , तर कधी फुगा बाह्या, कधी बेल स्लीव्हज तर कधी थ्री फोर्थ स्लीव्हज.

फॅशन जगतात एकेका ड्रेसच्या बनावटीकरिता इतकी प्रचंड मेहेनत आणि इतकी प्रचंड कल्पकता वापरली जाते की विचारू नका. आणि त्याचाच परिणाम म्हणजे शेकडो प्रकारचे आपण वापरत असलेले कपडे. एका स्टाइलचा कंटाळा आला तर ही घ्या दुसरी स्टाइल ट्राय करा, एका टाइपचा कंटाळा आला तर हे घ्या नवं काहीतरी वापरून पहा असं सतत आपल्यासमोर शेकडो पर्याय ठेवत फॅशन जगत सज्ज असतं.

साध्या बाह्यांचच उदाहरण घ्या ना, जसं कॉलरमध्ये प्रचंड व्हरायटी आहे तशीच बाह्यांमध्येही तब्बल चाळीसच्या आसपास प्रकार आहेत. शिवाय क्रिएटीव्हीटीला अंत नसतो या न्यायानं या बाह्यांमध्ये अनेक नवनवे क्रिएटिव्ह प्रकारही खुद्द शिवणारा स्वत:च्या मनानं आणि स्वत:च्या कल्पकतेनं करू शकतो.1. रेग्लान बाह्या - काखेपासून छातीपर्यंत तिरक्या आकारातून या बाह्या पुढे हाताच्या कोपरापर्यंत शिवलेल्या असतात.

2. कॅप बाह्या - खांद्याला केवळ एखाद्या कॅपप्रमाणे झाकणा-या या बाह्या अत्यंत स्मार्ट दिसतात. या बाह्यांना आतून कॅनव्हास लावून कडकपणा दिला जातो. यामुळे टोपीला ज्याप्रमाणे पुढल्या बाजूनं कपाळाच्यासमोरचा भाग असतो त्याप्रमाणे या बाह्या दिसतात.

3. ब्रेसलेट बाह्या - मनगटं आणि कोपर या दरम्यानपर्यंत लांब अशा या बाह्या असतात, थोडक्यात याच बाह्यांना थ्री फोर्थ असंही प्रचलित नाव आहे.

 

4. लँटर्न बाह्या - दोन भाग असलेल्या या लांब बाह्या असतात. लांब आणि छोट्या अशा दोन्हीही प्रकारात या बाह्या शिवता येतात. या प्रकारात एकावर एक असे दोन फ्लेअर्स शिवून साधारणत: कंदीलाचा आकार बाह्यांना दिला जातो. 

5. मटन स्लीव्हज- मेंढ्याच्या पायाच्या आकाराच्या बाह्या.  मटन स्लीव्हज. अगदी शब्दश: मेंढ्याच्या पायाचाच आकार या बाह्यांना दिलेला असतो. 

6. ज्युलिएट बाह्या - मटन स्लीव्ह्जलाच पुढे वाढवत नेले जाते आणि हाताच्या खालच्या भागाला, कोपराकडे येताना अगदी हाताच्या मापात फिटींगची बाही शिवली जाते.

 

 

7. बेल बाह्या - काही वर्षांपूर्वी या प्रकारच्या बाह्यांची खूप फॅशन आली होती. यामध्ये लांब आणि छोट्या अशा दोन्हीही प्रकारात या बाह्या शिवल्या जातात. एखाद्या घंटेच्या आकारप्रमाणे बाह्यांचा आकार असतो. आवडीप्रमाणे तो मोठा वा छोटा शिवता येतो.

8. फ्रीलच्या बाह्या - कोपरापर्यंत लांब आणि कोपरापासून पुढे वेगवेगळ्या आकारात फ्रील जोडली जाते. विशेषत: जीन्सवर किंवा स्कर्टवर घालावयाच्या टॉप्सना अशा प्रकारच्या स्लीव्हज शोभून दिसतात.

9. पॅगोडा बाह्या - खांद्यापासून कोपराच्या खालपर्यंत फिटींगची बाही आणि हाताच्या पंजावर एक- दोन किंवा त्याहून अधिक लेयर्सच्या फ्रिल्स अशापद्धतीने साधारणत: या बाह्या शिवल्या जातात.

 

10. बिशॉप बाह्या - वरच्या बाजूनं फिटींगच्या आणि मनगटापाशी फ्लेअर करून शिवाय कफद्वारे मनगटाभोवती गोलाकार फिटींगमध्ये जोडलेल्या अशा काहीशा या बाह्या असतात.

11. चौकोनी बाह्या - या बाह्या काखेपाशी चौकोनी आकारातून जोडलेल्या असतात आणि पुढे कोपराच्या काहीशा वरपर्यंत चौकोनी आकारात शिवलेल्या असतात.

12. पेटल बाह्या - फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे या बाह्या अत्यंत आकर्षक पद्धतीनं शिवलेल्या असतात. विशेषत: नेट किंवा ट्यूल वगैरेच्या तलम कपड्याच्या या बाह्या शिवल्या तर अधिक सुंदर आणि नाजूक दिसतात.

 

13. मार्माल्यूक किंवा व्हर्गो बाह्या - या बाह्या कोपरापर्यंत लांब असतात आणि प्रत्येक बाहीला पाच भाग केलेले असतात.

14. बटरफ्लाय बाह्या - या बाह्यांना वरच्या बाजुनं पफ असतो आणि नंतर कोपराच्या काहीशा वरपर्यंत त्या बेल आकारात असतात. फुलपाखरांच्या पंखाचीच कन्सेप्ट येथे लागू होते.

 

 

15. कोल्ड शोल्डर बाह्या - या बाह्यांची तर सध्या प्रचंड लाट आहे. या बाह्या अत्यंत आकर्षक लूक देतात.