शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

चिमुकल्यांची हेअर स्टाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 16:42 IST

लहान मुलींच्या केसांकडे पाहूनच कळतं की या पाच सहा वर्षांच्या चिमुरड्यांना नटायला मुरडायला किती आवडतं ते.

- मोहिनी घारपुरे- देशमुख लहान मुलींच्या केसांकडे पाहूनच कळतं की या पाच सहा वर्षांच्या चिमुरड्यांना नटायला मुरडायला किती आवडतं ते. मुलींची नटण्याची ही हौस पुरवण्यासाठी जेवढ्या त्यांच्या आया झटतात तितकं मार्केटही. लहान मुलींच्या आवडी निवडी लक्षात घेवून मार्केटमध्ये भरपूर अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध आहे. लहान मुली तशाही खूपच गोड आणि सुंदर दिसतात. या चिमुकल्या मुलींचा गोड गुलाबी रंग, निरागस भाव आणि कपाळावर रूळणारे केस हे एवढंच सौंदर्यही आपल्याला अगदी वेड लावतं. बोबडे बोल आणि हसरा चेहरा थेट मनाला भिडतो. या चिमुकल्यांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी हल्ली बाजारात भरपूर अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध आहेत.टिकटिकच्या पिनात्यापैकी विशेषत्त्वानं वापरल्या जाणाऱ्या टिकटिकच्या पिनांची तर अलिकडे खूपच फॅशन आहे. या पिना लावायला सोप्या, वापरायलाही फारशा अवघड नसल्यानं आणि लहान मुलींच्या केसांना अजिबात त्रास न देणाऱ्या असल्यानं जवळपास सर्वच चिमुकल्या त्या वापरताना दिसतात. फुलं, पानं, कार्टून कॅरेक्टर्स असं काहीही या पिनांवर असू शकतं. लहानमुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन या पिना त्यांच्याकरिता खास बनवल्या जातात. लहान मुलींसाठी फंक्शनली वापरण्याजोग्या हेअरपिन्सही बाजारात उपलब्ध आहेत. या हेअरपिन्सवर स्टोन्स लावलेले असतात. आकर्षक रंगाचे स्टोन्स लावलेल्या या पिनाही चिमुकल्यांना फारच आवडतात आणि शोभूनही दिसतात. हेअरबेल्ट्स कापडी आणि प्लॅस्टिकचे अक्षरश: हजारो प्रकारचे हेअरबेल्ट्स लहान मुलींसाठी बाजारात उपलब्ध आहेत. हे हेअरबेल्ट्सदेखील मुलींना आवडतील अशा आकर्षक डिझाईन्सचे मिळतात. बॉबी प्रिंट्स, फ्लोरल प्रिंट्स, कार्टून कॅरेक्टर त्यातही विशेषत: बार्बी आणि छोटा भीममधील चुटकी या कॅरेक्टर्सना जास्त पसंती दिली जाते. बीट्स अनेक लहान मुलींना बीट्सदेखील आवडतात. केसांच्या तीन तीन बटा घेऊन त्याच्या लहान लहान अशा अनेक वेण्या घालायच्या आणि टोकाशी हे बीट्स लावून द्यायचे म्हणजे अगदी सुंदर हेअरस्टाईल होते. वेणी न घालताही बटांच्या टोकाशी निरनिराळ्या रंगाचे बीट्स लावले तर फारच मस्त लुक येतो.