शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

​अमेरिकेतील पुरुषांनाही वाटते बायकांनीच करावे घरकाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 20:39 IST

एकविसाव्या शतकातही तेथील पुरुषांना वाटते की, बायकांनीच घरातील कामे आणि मुलांकडे लक्ष द्यावे.

स्वत:ला प्रगत देश म्हणणाऱ्या अमेरिकेतसुद्धा प्राचीन काळापासून चालत आलेला प्रचलित समज आजही कायम आहे. एकविसाव्या शतकातही तेथील पुरुषांना वाटते की, बायकांनीच घरातील कामे आणि मुलांकडे लक्ष द्यावे. पुरोगामी, आधुनिक आणि जेंडर इक्वॅलिटीच्या गोष्टी करणाऱ्या तेथील अनेक पुढाऱ्यांना हे तथ्य हादरून टाकणारे आहे.अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, पती-पत्नीच्या वैयक्तिक कमाईवरून नाही तर त्यांच्या जेंडरवरून घरकामाची जाबाबदारी टाकण्यात येते. म्हणजे पुरुषांना आजही पारंपरिक पद्धतीनुसार घरकामांची जबाबदारी महिलांचीच असते असे वाटते. अमेरिकन सोशिओलॉजिकल असोसिएशनच्या (एएसए) अकराव्या वार्षिक बैठकीमध्ये सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.यामध्ये अमेरिकेतील भिन्नलिंगी आणि समलिंगी जोडपे ‘घरकामाची जबाबदारी कोणाची’ याविषयी काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी इंडियाना विद्यापीठातील संशोधकांनी अध्ययन केले. त्यानुसार  सहभागी झालेल्या सुमारे ७५ टक्के पुरुषांना वाटते की, स्वयंपाक, धुणी-भांडी, सफाई, बाजार करणे यासारखी कामे महिलांचीच आहेत.९० टक्के पुरुषांनी सांगितले की, घराबाहेरची कामे ही पुरुषांची आहेत. म्हणजे व्यक्तीच्या आवडीनिवडी, मिळकत यापेक्षा त्याच्या जेंडरवरून अशी कामांची विभागणी केली जाते.