'मसाबा'चे ऑनलाईन आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:25 IST
मिंत्राच्या अनॉक ब्रँडच्या नव्या कलेक्शनचे नुकतेचे अनावरण करण्यात आले. याचे फॅशन डिझायनर मसाबा गुप्...
'मसाबा'चे ऑनलाईन आव्हान
मिंत्राच्या अनॉक ब्रँडच्या नव्या कलेक्शनचे नुकतेचे अनावरण करण्यात आले. याचे फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्यासोबत कोलॅबरेशन करण्यात आले आहे. क्वीर्कि डिझाईन्स आणि इथनिक स्टाईलच्या कपड्यांचा यात समावेश असून ऑनलाईनवर हे कपडे उपलब्ध असणार आहेत. मसाबा गुप्ताच्या स्टुडिओमध्ये या कपड्यांची निर्मिती करण्यात आली असून, कपड्यांची क्वॉलिटी ऑनलाईनही टिकवून ठेवण्याचे आव्हान असल्याचे तिने म्हटले आहे.आपण कोणतेही डिझाईन तयार करताना लोकांच्या पसंतीच्या विचार करून त्याची निर्मिती करतो, लोकांना त्यांच्या आवडीचे कपडे निवडायचे स्वातंत्र्य आहे. ते आपले ब्रँड म्हणूनच निवडतात. ऑनलाईनमध्येही लोक आपल्या बॅँडला पसंती देतील, असेही मसाबाचे म्हणणे आहे.