इंग्लंडमध्ये मीडिया करतेय माल्याचा पाठलाग....पण शोधण्यात अपयशी, माल्याचे पुन्हा ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 01:19 IST
भारताबाहेर गेल्यानंतर विजय माल्याने पुन्हा एकदा ट्विट केले आहे
इंग्लंडमध्ये मीडिया करतेय माल्याचा पाठलाग....पण शोधण्यात अपयशी, माल्याचे पुन्हा ट्विट
भारताबाहेर गेल्यानंतर विजय माल्याने पुन्हा एकदा ट्विट केले आहे. रविवारी माल्याने एका ट्विटमध्ये लिहिले की, इंग्लंडमध्ये मीडिया माझा पाठलाग करीत आहे. पण त्यांना योग्य जागा सापडत नाही, हे दु:ख आहे. मी मीडियाबरोबर बोलणार नाही. त्यामुळे परिश्रम करू नका. देश सोडण्याबाबत माल्यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट केले होते, की त्यांनी मी पळकुटा नाही असे लिहिले होते.