शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

जुन्या वर्तमानपत्रापासून वॉलहॅगिंग बनवा आणि झाड वाचवण्याचं पुण्य मिळवा!

By admin | Updated: July 12, 2017 17:10 IST

कागद फेकण्याआधी आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो का? सूचतंय काही? नसेल सूचत तर ही गंमत करून पाहा.

 

- सारिका पूरकर -गुजराथी

आपल्या पृथ्वीला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवायचं असेल तर ‘झाडं लावा, झाडं जगवा’असं सगळीकडे वारंवार सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही. मोजके पर्यावरणप्रेमी सोडले तर झाडांकडे पाहायला कोणाला वेळच नाहीए. आपण याबाबत काही करू शकतो का?

तर हो... सध्या जी झाडं जिवंत आहेत ती तरी आपण कत्तलीपासून वाचवू शकतो. तुम्हाला माहीतच असेल की, आपण सारे ज्या कागदावर लिहितो, तो झाडांपासूनच बनतो. म्हणजे कागद तयार करण्यासाठी हजारो झाडांची कत्तल होत असते. आपण कागद फेकून देतो तेव्हा त्या झाडाला काय वाटत असेल? जरा विचार करा, कागद फेकण्याआधी आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो का? सूचतंय काही? नसेल सूचत तर ही गंमत करून पाहा.

आपण रद्दीपेपर किंवा जुन्या मासिकांच्या कागदांपासून भिंतींवर टांगता येतील असे सुंदर ‘वॉलहॅँगिंग’ बनवू शकतो. कागदाच्या पुर्नवापराचा असा आखीव रेखीव पुर्नवापर करूनही आपण झाडे वाचवायला मदत करू शकतो.

पेपरपासून वॉलहॅगिंग कसं कराल?

* यासाठी घरातलं जुनं वर्तमानपत्र, जाड पुठ्ठा, फेव्हिकॉल, कात्री, स्केल आणि पेन हे साहित्य जमवा.

* सर्वांत आधी वर्तमानपत्रातून ४ इंच लांबी-रुंदीचे भरपूर चौकोनी तुकडे कापून घ्या. जाड पुठ्ठ्यावर एखादी मध्यम आकाराची ताटली ठेवून तिच्याभोवती पेननं गोलाकार आखून तो कापून घ्यावा.

 

* कागदचा चौकोनी तुकडा घेऊन त्याचे चार कोपरे उभे दिसतील असे धरा. नंतर वरचा-खालचा भाग तसाच राहू द्या आणि उजवीकडचा भाग डावीकडच्या भागावर अलगद चिकटवा. चणे-फुटाण्यासाठी जसा कोन असतो, तसाच हा कोन दिसेल. असे बरेच कोन तयार करून ते वाळू द्या.

* कोन चांगले वाळले की गोलाकार कापलेला पुठ्ठा घ्या. या गोलाकारात आपल्याला बाहेरून आत याप्रमाणे कोन चिकटवायचे आहेत. त्यासाठी कोनाच्या तळाला फेविकॉल लावून तो कोन गोलाकाराच्या वरच्या भागात असा चिकटवा की त्याचा बहुतांश भाग गोलाकाराच्या बाहेर राहील आणि टोक आत चिकटलं जाईल. त्याच्याशेजारी त्याच पद्धतीनं दुसरा मग तिसरा असे कोन चिकटवत जा. पहिली रांग पूर्ण करा. वाळू द्या.

 

* आता गोलाकाराच्या वरच्या भागात जे कोन चिकटवले आहेत, त्याखाली दुसरी रांग तयार करायची आहे. त्यासाठी पुन्हा कोनाच्या खालच्या भागाला फेव्हिकॉल लावा अन् पहिल्या रांगेतल्या दोन कोनांच्या मधोमध हा दुसऱ्या रांगेतले कोन चिकटवा. * आपले हे वॉलहॅँगिग भरगच्च दिसण्यासाठी गोलाकारात आणखी तिसऱ्या रांगेतही पेपरकोन चिकटवून घ्या.

* पेपरकोनच्या तीन रांगा पूर्ण झाल्यावर मधोमध कृत्रिम फुलं, सॅटिन कापड लावून सुशोभित करू शकता. पुठ्ठ्याला पाठीमागून दोरीचे लूप बनवा आणि ते भिंतीवर टांगा. याच प्रकारे तुम्ही लहान कोन बनवून, ते तीन गोलाकारांत चिकटवून तीन पीसचं वॉलहॅँगिंगही बनवू शकता. जुन्या मासिकातील रंगीत कागदांचा वापर केल्यास हे वॉलहँगिग आणखी उठावदार दिसू शकेल.