शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
3
"भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
4
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
5
कोणीतरी आले अन् गोळ्या झाडून गेले! हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा अखेरची घटका मोजू लागला
6
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
7
अनंत अंबानींपेक्षाही मोठं लग्न? 'या' शाही विवाहात प्रत्येक पाहुण्यावर ४२ लाख होणार खर्च, २०० VIP
8
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
9
ब्रेकअप? 'या' अभिनेत्याला डेट करत होती सारा तेंडुलकर, कुटुंबाला भेटल्यानंतर नातं तुटल्याची चर्चा
10
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
11
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
12
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
13
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
14
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
15
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
16
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
17
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
18
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
19
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
20
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!

अनारकली पॅटर्न नेहमीच भाव खाणार. ग्रेसफुल दिसायचय मग अनारकलीला पर्याय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 18:18 IST

तुमच्या घरंच वातावरण जर थोडं पारंपरिक असेल आणि तरीही तुम्हाला थोडंस स्मार्ट दिसायचं असेल तर अनारकली ड्रेस  उत्तम पर्याय आहे.

ठळक मुद्दे*छातीपर्यंत एकदम मापात, व्यवस्थित फिटींगचा आणि त्याखाली साधारण गुडघ्यापर्यंत उंचीचा मोठा घेर असलेला हा ड्रेस आणि त्याखाली चुरीदार हा एकूणच पेहराव खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतो.* अनारकली पॅटर्नवर पारंपरिक पद्धतीचे कानाताले आणि थोड्याशा गोल्डन, सिल्व्हर किंवा मोतीकाम वगैरे केलेल्या उंच टाचांच्या चपला घातल्यात तर या पॅटर्नवरचा लूक कम्पलीट होतो.* फार बारीक किंवा फार जाड्या मुलींवर मात्र अनारकली फार खुलतोच असं नाही.

- मोहिनी घारपुरे-देशमुखपारंपरिक आणि आधुनिक असा दोन्हीचा मिलाफ कोणत्या पोषाखात दिसत असेल तर तो म्हणजे अनारकली पॅटर्नचा ड्रेस. लहानांपासूण मोठ्यांपर्यंत कित्येकींना काही खास प्रसंगी हा अनारकली पॅटर्नच हवा असतो.तुमच्या घरंच वातावरण जर थोडं पारंपरिक असेल आणि तरीही तुम्हाला थोडंस स्मार्ट दिसायला आवडत असेल तर तुमच्यासाठी स्टाईल स्टेटमेण्ट म्हणून तुम्ही या अनारकली ड्रेसेसकडे पहायला हरकत नाही. किंबहुना हेच ड्रेसेस तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.

छातीपर्यंत एकदम मापात, व्यवस्थित फिटींगचा आणि त्याखाली साधारण गुडघ्यापर्यंत उंचीचा मोठा घेर असलेला हा ड्रेस आणि त्याखाली चुरीदार हा एकूणच पेहराव खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतो.

अलिकडे तर अनारकली पॅटर्नमध्ये प्रचंड प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला साजेसा लुक हा अनारकली पॅटर्न देतो. हा अनारकली ड्रेस  परिधान करणं म्हणजे तुम्ही कलासक्त, बुद्धीमान, चौकस आणि सौंदर्याच्या भोक्त्या आहेत असं समजतं.

अनारकली पॅटर्नवर पारंपरिक पद्धतीचे कानाताले जसे झुबे, मोराचे कान वगैरे घातले आणि थोड्याशा गोल्डन, सिल्व्हर किंवा मोतीकाम वगैरे केलेल्या थोड्याशाच उंच टाचांच्या चपला घातल्यात तर या पॅटर्नवरचा लूक कम्पलीट होतो. ग्रेसफुल लूक हवा असेल तर अनारकली पॅटर्नशिवाय दुसरा पर्याय नाही.अनारकली पॅटर्नचा ड्रेस हा खरंच अनारकलीच्याच स्टाईलवरून बनवला गेला असावा असं वाटतं.

 

विशेषत: मध्यम देहयष्टीच्या मुलींनी फॅशनचा एक उत्तम पर्याय म्हणून या प्रकारच्या पोषाखाकडे पाहिलं पाहिजे. फार बारीक किंवा फार जाड्या मुलींवर मात्र अनारकली फार खुलेलच असं ठामपणे सांगू शकत नाही.

हल्ली अनारकली ड्रेसेसवर भरगच्च जरीकाम केलेलं असतं. त्यावर नेटच्या ओढण्या, सोनेरी चंदेरी वर्क आणि त्या ड्रेसेसचा एक वेगळाच फॉल यामुळे मात्र अनारकली नेहेमीच भाव खाऊन जातो यात शंका नाही..