शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

सकाळी सुंदर दिसायचंय मग रात्री या गोष्टी करण्याचा कंटाळा अजिबात करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 18:44 IST

सुंदर दिसण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ चेहेºयावर नुसते मेकअपचे थर देवून चालत नाही. तर आधी झोपण्याआधी थोडा वेळ देवून आपल्या त्वचेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं.

ठळक मुद्दे* दिवस संपतांना आपलं मन आणि शरीर जेवढं थकतं तितकीच त्वचाही थकलेली असते.* त्वचेचा थकवा दूर केला नाही तर त्याचा परिणाम दुसºया दिवशी आपल्या दिसण्यावर होतो.* रात्री झोपण्यापूर्वी त्वचेसाठी काही गोष्टी नियम म्हणून केल्या तरच दुसर्या दिवशी दिवसभर प्रसन्न, उत्साही आणि सुंदर दिसण्यात आपली त्वचाही पुढाकार घेते.

- माधुरी पेठकर.दिवसभर काम करून थकल्यानंतर आपलं शरीर आणि मन थकतं. हा थकवा दूर करण्यासाठी कोणी रात्री झोपण्याआधी आरामशीर बसून थोडा वेळ टी.व्ही बघतं, कोणी पुस्तक वाचतं, कोणी गप्पा मारतं तर कोणी एकटं बसून गाणी ऐकतं. आता प्रत्येकाच्या आरामाच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. जो तो त्या त्यानुसार आपल्या शरीर मनाला रिलिफ देण्याचा प्रयत्न करत असतो. पण दिवस संपत असताना आपण कधी स्वत:ला नीट आरशात बघितलं का? नीट बघितलं तर आपण थकलेलो वाटत असतो आणि आपली त्वचा ही मलूल झालेली दिसते. त्वचेच मलूल होणं म्हणजेच त्वचेचा थकवा.

त्वचेला थकवा येण्यामागे मनावरचा ताण, ऊन वारा पावसाचा परिणाम, मेकअप आणि दुर्लक्ष अशी अनेक कारणं असतात. पण या सर्व कारणांमुळे दिवसअखेर आपली त्वचाही थकत असते हे आधी मान्य करावं. हा थकवा दूर केला नाही तर त्याचा परिणाम दुसर्या दिवशी आपल्या दिसण्यावर होतो. सुंदर दिसण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ चेहेर्यावर नुसते मेकअपचे थर देवून चालत नाही. तर आधी झोपण्याआधी थोडा वेळ देवून आपल्या त्वचेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं.

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेसाठी काही गोष्टी नियम म्हणून केल्या तरच दुसर्या दिवशी दिवसभर प्रसन्न, उत्साही आणि सुंदर दिसण्यात आपली त्वचाही पुढाकार घेते.

 

रात्री झोपण्यापूर्वी 

* बाहेरून, कामावरून, घरातलं काम करून किंवा एखादा कार्यक्रम अथवा समारंभाला जावून आल्यानंतर कितीही थकवा वाटत असला तरी चेहेर्यावरचा मेकअप काढायचा कंटाळा करू नये. रात्रभर मेकअप तसाच ठेवला तर त्वचेवर त्याचे वाईट परिणम होतात. त्वचा खराब होते. त्वचेला मोकळा आणि नैसर्गिक श्वास घेण्याची संधी मिळत नाही. मेकअपमुळे त्वचेला संसर्ग होण्याचीही भिती असते. त्यामुळे बाजारात मेकअप काढणारे पॅडस मिळतात त्याचा आणि मिसेलर वॉटरचा उपयोग करून चेहेर्यावरचा मेकअप काढता येतो. किंवा आॅलिव्ह आॅइलनंही मेकअप काढता येतो.कसाही काढा पण झोपण्याआधी चेहेर्यावरचं मेकअपचं ओझं उतरणं गरजेचं असतं.

* रात्री झोपण्यापूर्वी रोज चांगल्या क्लिन्जरनं आपला चेहेरा स्वच्छ करावा. यामुळे चेहेर्यावरच्या त्वचेवरची धूळ स्वच्छ होते, तेलकटपणा निघून जातो. तसेच त्वचेची रंध्र मोकळी होतात. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य ते क्लिन्जर निवडून आपण ही काळजी घेवू शकतो.

 

* दिवसा बाहेर जातना चेहेर्याला लावयला जसं आपण एखादं क्रीम ठेवतोच. तसंच रात्री चेहेर्याला लावायचं क्रीम असणं त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. रात्रीच्या क्रीममध्ये प्रामुख्यानं मॉश्चरायझिंग घटक असतात. त्यामुळे त्वचेला हवा असलेला ओलावा या नाइट क्रीममधून मिळतो. या क्रीममुळे त्वचेच्या पेशींना बळ मिळते.

* डोळ्यांखालची वर्तुळ, काळसरपणा किंवा सूज यामुळे सौंदर्यास बाधा येते. ही डोळ्याखालची त्वचा सुदृढ करायची असल्यास रात्री झोपण्याआधी डोळ्यांखाली आय क्रीम लावावं. या क्रीममुळे डोळ्याखालची त्वचा कोरडी पडत नाही त्यामुळे डोळ्याखाली वर्तुळ किंवा सुरकुत्या पडत नाही.

* त्वचा निरोगी आणि सुदृढ करायची असेल तर त्वचेला मेकअपची नाही तर नैसर्गिक घटकांच्या लेपाची गरज असते. या लेपामुळे त्वचा स्वच्छ होण्यासोबतच तजेलदार आणि निरोगीही होते. त्यामुळे आपल्या त्वचेला चालणारे नैसर्गिक घटक माहिती करून त्याचा लेप रात्री झोपण्यापूर्वी दहा पंधरा मीनिटं लावावा. सुकल्यावर तो धुवून मग त्वचेला नाइट क्रीम लावून झोपावं. लेप लावणं रोज जमलं नाही तरी आठवड्यातून दोनदा तरी त्वचेसाठीहा उपाय करायलाच हवा.

* शांत आणि पुरेशी झोप हा शरीर मनाच्या थकव्यासोबतच त्वचेचा थकवा दूर करणारा सोपा उपाय आहे. रोज आपली झोप पूर्ण होईल याकडे लक्ष द्यायला हवं.