शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

​जाणून घ्या काय आहे ‘रॅम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 17:32 IST

मोबाइलमध्ये प्रोसेसर जसे महत्त्वाचे आहे, तसेच रॅमदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. संगणकात आणि मोबाइलमध्ये रॅम यांची प्रक्रिया सारखीच असते, मात्र त्यांची काम करण्याची प्रणाली मात्र वेगळी असते...........

-Ravindra Moreमोबाइलमध्ये प्रोसेसर जसे महत्त्वाचे आहे, तसेच रॅमदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. संगणकात आणि मोबाइलमध्ये रॅम यांची प्रक्रिया सारखीच असते, मात्र त्यांची काम करण्याची प्रणाली मात्र वेगळी असते. रॅम जर काम करत नसेल तर मोबाइल बंद पडू शकतो. यासाठी मोबाइलमध्ये रॅमचे महत्त्व खूप आहे. आजच्या सदरात आपण रॅमचे महत्त्व तसेच अंतर्गत साठवणूक व बाह्य साठवणूक याचे महत्त्व जाणून घेऊ या....रॅम म्हणजे काय?रॅम म्हणजे ‘रॅँडम अ‍ॅक्सेस मेमरी’ होय.आपल्या फोनमधील एसडी कार्ड किंवा बाह्य एसडी कार्ड किंवा अंतर्गत साठवणूक प्रणालीपेक्षाही जलद गतीने काम करणारी ही प्रणाली आहे. रॅम म्हणजे माहिती आणि प्रोसेसर यांच्यातील दुवा म्हणता येईल. आपल्या मेंदूप्रमाणेच रॅम हा मोबाइलचा किंवा अगदी संगणकाचा मेंदू म्हणता येऊ शकेल. आपण मोबाइलमध्ये साठवू इच्छित असलेली माहिती किंवा मोबाइलमधील उपलब्ध माहिती शोधू इच्छित असू, तर जी प्रक्रिया करतो ती सर्व प्रक्रिया रॅमच्या माध्यमातून होत असते. आपल्या फोनमधील प्रोसेसर ज्या वेळेस एखादी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असतो, त्या वेळेस जर ही माहिती रॅमच्या माध्यमातून उपलब्ध झाली तर लागणारी बॅटरीची ऊर्जा ही नियमित साठवणूक प्रणालीपेक्षा कमी लागते. यामुळे बॅटरी साठवणुकीच्या दृष्टीनेही रॅम उपयुक्त ठरते. रॅम आणि अ‍ॅँड्रॉइडजेव्हा आपण एखादे अ‍ॅप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करत असतो तेव्हा हे प्रथम ते अ‍ॅप रॅममध्ये साठवले जाते आणि नंतर इन्स्टॉल होते. जे अ‍ॅप्स रॅममध्ये कायम राहतात आणि जे आपण वापरत नसतो ते अ‍ॅप्स काही वेळाने बॅकग्राऊंडला पाठविले जातात. जर आपण हे अ‍ॅप फोनमधून काढले नसतील आणि कधी तरी आपल्याला वापरायची गरज पडेल त्या वेळेस ते अ‍ॅप रॅमच्या माध्यमातून पुन्हा कार्यान्वित होतात. रॅम संगणकापेक्षा अँड्रॉइड फोनवर वेगळ्यापद्धतीने काम करत असते. जेव्हा रॅमची क्षमता पूर्ण भरतेअ‍ॅँड्राइड फोन यूजर्सची एकच समस्या असते ती म्हणजे रॅमचा जास्त वापर होणे. पण अँड्रॉइड आॅपरेटिंग प्रणालीची रचनाच अशी आहे की ज्याचा जास्तीत जास्त वापर हा रॅमच्या माध्यमातून केला जातो. यामुळे तुम्हाला जास्त काळजी करायची गरज नाही किंवा एखादे अ‍ॅप वापरून झाल्यावर ते बंद केलेच पाहिजे असेही नाही. अँड्रॉइड आॅपरेटिंग प्रणाली ज्या वेळेस गरज भासेल त्या वेळेस स्वत:हून रॅम रिकामी करत असते. यामुळे रॅममध्ये जास्तीत जास्त जागा रिकामी व्हावी यासाठी सतत रॅम क्लिअर करत राहू नये.रॅममध्ये अ‍ॅप्स राहिले तर बॅटरीवर परिणाम होतो का? फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटरसारखे अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन्स येणे अपेक्षित असते ते अ‍ॅप्स आपली बॅटरी खर्च करत असतात. कारण हे अ‍ॅप सतत संबंधित सर्व्हरशी संपर्कात असतात. काही अ‍ॅप्स एकदा इन्स्टॉल केले की आपण ज्या वेळेस उघडू त्याच वेळेस काम करतात ते अ‍ॅप्स बॅटरीच्या कामकाजावर परिणाम करत नाहीत.  त्यातीलही काही अ‍ॅप्स छुप्या मार्गाने आपली बॅटरी खर्च करत असतात. जर तुम्हाला तुमचा बॅटरी बॅकअप सातत्याने कमी होतोय असे वाटत असेल तर अशा वेळी तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन बॅटरी आॅप्शनचा पर्याय निवडा. जर तो पर्याय नसेल तर बॅटरी चेकर अ‍ॅप वापरून तुम्ही तुमची बॅटरी नेमकी कुठे खर्च होते हे तपासून पाहू शकता. जर त्यात काही अनावश्यक अ‍ॅप्स असतील तर ते तुम्ही बंद करू शकता. रॅमची क्षमता वाढता येऊ शकते का?मोबाइलची रॅम वाढविणे शक्य नसते. मात्र जास्त रॅम असलेले मोबाइल उपलब्ध आहेत. रॅमची क्षमता जेवढी जास्त तेवढी क्षमता तुमच्या फोनच्या कामकाजाची वाढते. जर तुम्हाला अगदीच उत्तम प्रकारचे फोनचे कामकाज चालवायचे असेल तर किमान दोन जीबी रॅम हवी. साधारणत: ५१२ एमबी रॅम असेल तर आपण २०० एमबीपर्यंतचे अ‍ॅप्स त्यामध्ये वापरू शकतो. रॉम आणि एसडी कार्डमोबाइलमध्ये रॅमच्या जोडीला रॉमही कार्यरत असतो. रॉम म्हणजे 'रीड ओन्ली मेमरी' होय. रॉम हा मोबाइलमधील अंतर्गत साठवणूक क्षमतेचाच एक भाग होय. त्यात साठवलेली गोष्ट आपल्याला कधीच मोबाइलच्या बाहेर काढता येत नाही. उर्वरित अंतर्गत साठवणुकीमध्ये आपण आपले अ‍ॅप्स आणि मीडिया फाइल्स इत्यादी गोष्टी साठवून ठेवत असतो. यात साधारणत: फ्लॅश मेमरी वापरली जाते किंवा त्यांना तांत्रिक भाषेत 'इलेक्ट्रिकली इरेझेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी' (ईईपीआरओएम) असे म्हणतात. या प्रकारची मेमरी विशिष्ट ब्लॉक्समध्ये वाचली जाते किंवा त्याच ब्लॉक्समध्ये डिलिटही केली जाते. साठवणुकीची अडचणअँड्रॉइड आॅपरेटिंग प्रणालीमध्ये अंतर्गत साठवणुकीची अडचण गुगलहीदेखील अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. मात्र दरवेळेस उभे राहणारे नवे आव्हान गुगलला या ध्येयापर्यंत पोहचण्यास आडकाठी निर्माण होत आहे. यामुळे अनेकदा अँड्रॉइड वापरकर्त्यांकडून माज्याकडे फोन स्टोअरेजमध्ये जागा आहे मात्र जागा उपलब्ध नाही असे दाखविले जाते अशा तक्रारी येत असतात. याचबरोबर अंतर्गत साठवणूक क्षमता असतानाही अ?ॅप्स डाऊनलोड न होण्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येत असतात. मात्र स्टोअरजेच्या या अडचणीची दखल नवीन अँड्रॉइडच्या आवृत्तीमध्ये घेण्यात आली असून, त्यावर आधारित नवीन मोबाइलमध्ये ही अडचण येणार नाही अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. ज्यांच्याकडे अँड्रॉइड किटकॅटपेक्षा खालच्या आॅपरेटिंग सिस्टीमचे फोन आहेत त्यांनी अंतर्गत साठवणुकीतील नको असलेले अ‍ॅप्स डिलिट करावे तसेच जे पूर्वअंतर्भूत अ‍ॅप्स आहेत त्यापैकी काही अ‍ॅप्स डिसेबल करून ठेवली तरी बºयापैकी जागा उपलब्ध होऊ शकते.