चालू रखो भलाई का जमाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 04:28 IST
डॅनियलने ‘लोमा लिंडा चिल्ड्रेन्स हॉस्पिटल’मधील अॅडमिट मुलांना व्हॅन्स कंपनीकडून मिळणारे शूजचे वाटप केले.
चालू रखो भलाई का जमाना
इंटरनेटने अनेक सामन्य लोकांना हीरो बनवले आहे. चालता-बोलता लोकांना एका क्षणात व्हायरल करून प्रसिद्ध करण्यााची अद्भुत क्षमता इंटरनेटमध्ये आहे.अशाच प्रकारे प्रसिद्ध झालेल्या डॅनियल लारा या शाळकरी मुलाने त्याच्या स्टारडमचा समाजकार्यासाठी उपयोग करून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. }}}}‘डॅम्नड् डॅनियल’ फेम डॅनियलचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाल्यानंतर ‘एलेन डिजेनरेस शो’मध्ये त्याला आजन्म ‘व्हॅन्स’ कंपनीचे शूज मोफत मिळण्याचे गिफ्ट मिळाले.आयु्ष्यभर आपल्या आवडीचे शूज मोफत मिळणार यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट कोणती? या अनोख्या गिफ्टद्वारे इतरांना मदत करण्याचा त्याने निर्णय घेतला. डॅनियल आणि त्याचा मित्र जॉश होल्झने ‘लोमा लिंडा युनिव्हर्सिटी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल’मधील अॅडमिट मुलांना व्हॅन्स कंपनीकडून मिळणारे शूजचे वाटप केले. त्याच्या अशा समाजपयोगी कार्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. }}}}