केटची ऑस्कर ट्रॉफी बाथरूममध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:01 IST
'टायटॅनिक' या गाजलेल्या चित्रपटाची नायिका केट विन्सलेट हिने अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. '...
केटची ऑस्कर ट्रॉफी बाथरूममध्ये
'टायटॅनिक' या गाजलेल्या चित्रपटाची नायिका केट विन्सलेट हिने अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. 'द रिडर' या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला ऑस्कर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. या ऑस्कर पुरस्काराची ट्रॉफी बाथरूममध्ये ठेवत असल्याचा खुलासा खुद्द तिनेच अलीकडे केला आहे. ३९ वर्षीय केटला आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलायला फारसे आवडत नाही. प्रथम जिम थ्रेप्लेटन (१९९८ ते २000१) आणि नंतर सॅम मेंडेस (२00३ ते २0११) यांच्याशी झालेले तिचे विवाह मोडले. ''माझ्या जीवनात काय घडले, हे कोणालाच माहीत नाही. माझे दोन्ही विवाह का टिकले नाहीत, हेदेखील कोणालाच माहीत नाही. मला या अंतर्मुख स्वभावाचा अभिमान वाटतो,'' असे काहीसे गूढ वक्तव्य केटने केले आहे.