फक्त एक गाणे अन् गोंधळ सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:47 IST
फक्त एक गाणे अन् गोंधळ सुरूप्रेक्षकांनी धुडघूस घातल्यामुळे पॉप सिंगर जस्टिन बीबर याला नॉवेर्तील ओस्लो येथील शो मध्येच रद्द करावा लागला.
फक्त एक गाणे अन् गोंधळ सुरू
प्रेक्षकांनी धुडघूस घातल्यामुळे पॉप सिंगर जस्टिन बीबर याला नॉवेर्तील ओस्लो येथील शो मध्येच रद्द करावा लागला. अल्पावधीतच जगभरात नाव कमावलेल्या जस्टिनने अवघे एक गाणे गायल्यावर प्रेक्षकांनी गोंधळ घातला. या आधी त्याने मिलानमध्ये केलेल्या शोला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. या पार्श्वभूमीवर ओस्लो येथील प्रेक्षकांच्या गैरवर्तनामुळे बीबरला धक्का बसला. गुरुवारी रात्री झालेल्या या घटनेनंतर त्याने आपल्या प्रायवेट जेटमधून ओस्लो सोडणे पसंत केले.