दिवाळीसाठी भारतीयांचा जगभर प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:08 IST
बरेच लोक सध्या दिवाळी साजरी करण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत मोठय़ा सुट्टीवर जाण्याला पसंती देतात.
दिवाळीसाठी भारतीयांचा जगभर प्रवास
बरेच लोक सध्या दिवाळी साजरी करण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत मोठय़ा सुट्टीवर जाण्याला पसंती देतात. एका ट्रॅव्हल्स वेबसाइटच्या सर्वेक्षणानुसार असे समोर आले की, भारतीय आता या सुट्टय़ांच्या काळात विदेशातील प्रेक्षणीय स्थळांची सहल काढण्याला पसंती देत आहेत. आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय दिवाळीचा उत्सव अनुभवण्यासाठी सगळ्यात जास्त पर्यटक भारतात येत असतात. एकंदरच दिवाळीच्या सुट्टय़ा या पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहेत. हॉटेल्स डॉट कॉम या वेबसाइटच्या एकंदर सर्वेक्षणानुसार अशा पर्यटकांकडून युरोपला पहली पसंती मिळत आहे. देशाअंतर्गत सहलीत गोव्याला नेहमी सारखीच पहिली पसंती मिळत आहे. एकंदरच हॉटेल्स डॉट कॉमनुसार युरोप हे इंटरनेटवर भारतीयांनी शोधलेले सगळ्यात जास्त पसंतीचे ठिकाण ठरले आहे. तर देशाअंतर्गत आघाडीवर गोवाच प्रथम क्रमांक राहिले आहे. केवळ परदेशी नागरिकच नव्हे तर भारतीयही आता आऊटडोअर दिवाळी साजरी करू लागले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या काळात पर्यटन व्यवसायाला बूम मिळत आहे. प्रामुख्याने समुद्रकिनार्यांना दिवाळीच्या उत्सवात फिरण्यासाठी प्राधान्य दिले जाते. अनेक जण तर या काळात आठ ते दहादिवसांचे टूर पॅकेजस घेऊन फिरत आहेत.