शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आरोग्य वाढवायचेय? मग या पाच गोष्टी कराच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 18:34 IST

जर तुम्हाला निराश वाटत असेल, आर्थिक चणचण असल्यामुळे चिंता वाटत असेल तर केवळ ह्यसकारात्मक विचारह्ण करून बरे वाटणार नाही. त्यासाठी शरीराचीसुद्धा हालचाल गरजेचे आहे. तुमच्या मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांना शारीरिक व्यायामचे औषध उपलब्ध आहे.

आजकाल मनावर टेंशन, ताण-तणाव, दबाव-दडपण, भीती आणि चिंता असणे फार सामन्य बाब आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य खालवण्याच्या तक्रारी आपण वरच्या वर ऐकत असतो. ह्यमेंटल स्ट्रेंग्थह्ण वाढविण्यासाठी किंवा ती अधिक बळकट करण्यासाठी आपण ध्यान-धारणा किंवा मेडिटेशन वगैरे करतो परंतु त्यामुळे हवा तसा परिणाम होताना दिसत नाही.मग अशा वेळी शारीरिक व्यायाम कामी येऊ शकतो. आश्चर्य वाटले? मानसिक आरोग्य आणि शारीरिक व्यायामाच संबंध कसा असू शकतो? अहो, ग्रीक लोकांना फार फार वर्षांपूर्वीच मन आणि शरीराचा संबंध ज्ञात होता. आता ती वेगळी गोष्ट आहे की, वैद्यकशास्त्राला तो संबंध मान्य करायला मध्यंतरी बराच काळ गेला; पण आता अनेक वैज्ञानिक संशोधनातून शारीरिक आणि मानिकस आरोग्यातील परस्पर संबंध सिद्ध झाला आहे.म्हणजे जर तुम्हाला निराश वाटत असेल, आर्थिक चणचण असल्यामुळे चिंता वाटत असेल तर केवळ ह्यसकारात्मक विचारह्ण करून बरे वाटणार नाही. त्यासाठी शरीराचीसुद्धा हालचाल गरजेचे आहे. तुमच्या मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांना शारीरिक व्यायामचे औषध उपलब्ध आहे.तुमचे मानसिक आरोग्य अधिक बळकट करण्यासाठी पुढील पाच शारीरिक म्हटल्या जाऊ शकतात अशा गोष्टी केल्या पाहिजेत.१. नैराश्य कमी करण्यासाठी चालणे वाढवामानसिक आरोग्याशी निगडित समस्यांवर शारीरिक हालचालींच्या उपचाराची उपयुक्तता  अनेक अध्ययनातून सिद्ध झालेली आहे. आठवड्याभरात कमीतकमी २०० मिनिटे जरी चालले तरी नैराश्य कमी होण्यास मदत मिळते. म्हणजे दिवसाकाठी ३० मिनिटे चालून तुम्ही निराश होण्यापासून वाचू शकता. चालल्यामुळे मानसिक बरोबरच भावनिक आरोग्यदेखील सुधारते.२. शारीरिक वेदना कमी करण्यासाठी हसातुमचे निरागस-मनमोहक हास्य अनेक गोष्टींवर इलाजवर्धक ठरू शकते. हसमुख स्वभाव असणारे लोक तणावामुळे फरक पडत नाही. संशोधनातून असे दिसून आलेले आहे की, हसण्यामुळे तणावपूर्वक स्थितीमध्येसुद्धा तुमच्या हृदयाची स्पंदने सामान्य राहतात. त्यामुळे शारीरिक वेदनेची तीव्रता कमी जाणवते.३. लक्ष केंद्रित करण्यासाठी दीर्घश्वास घ्यातुमची एकाग्रता वाढविण्यासाठी काही मिनिटे दीर्घ श्वास घेणे लाभदायक ठरू शकते. तुम्ही जर मल्टीटास्कर असाल तर यामुळेच खूप फायदा होतो. एकाच वेळी अनेक कामे करणाऱ्या लोकांना एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे सोप नसते. अशावेळी डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. फरक नक्कीच जाणवेल.४.  तणावमुक्तीसाठी योगा करायोगाचे काय काय आणि किती फायदे आहेत याची माहिती येथे सांगण्याची गरज नाही. तणाव कमी करण्यासाठी तर योगा केलाच पाहिजे. चिंता व इतर मानसिक समस्यांवर योगामुळे नियंत्रण मिळवता येते. म्हणून रोजच्य रोज योग करायलाच हवा.५. चिंतामुक्तीसाठी वजन उचलाजवळपास १५ टक्के लोकांना नियमितपणे अँग्झायटीची (चिंता) समस्या जाणवते. त्यामध्ये प्रामुख्याने अस्वस्थता, भीती, काळजी किंवा भीती हे कॉमन लक्षणे आहेत. लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाही तर झापेचा त्रास, शारीरिक वेदना, आजारपण उद्भवू शकते. त्यावर चांगला उपाय म्हणजे वजन उचलणे. विशेष म्हणजे अवजड वस्तू नाही तर किमान शारीरिक क्षमतेला आव्हानात्मक व्यायाम करावा.