शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘सणसमारंभाला हवी हटके डिझायनर साडी’. तुमचा हा हट्ट कॅटलॉग पीस पूर्ण करेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 19:13 IST

बाजारात कॅटलॉग पीस म्हणून मोठ्या प्रमाणात साड्या उपलब्ध आहेत . त्यामुळे तुम्हाला डिझायनर साड्यांमध्ये निवड करायला पुष्कळ प्रकार चोखंदळपणे पाहता येऊ शकतात.

ठळक मुद्दे* कांथा, फुलकारी, जरदोसी, राजस्थानी पॅचवर्क, कशीदाकारी, आरी, मिरर वर्क, लेदर वर्क, कुंदनवर्क अशा कितीतरी प्रकारात या कॅटलॉग पीस साड्या बाजारात आणि आॅनलाइनही मिळतात.* अत्यंत तलम, रेशमी, झुळझुळीत अशा प्रकारच्या कापडाची निवड या साड्यांसाठी केली जाते.* बटबटीत साडी आणि अत्यंत ग्रेसफुल साडी असे दोन महत्त्वाचे फरक या प्रकारच्या साड्यांमध्ये असतात. त्यांपैकी आपल्याला कोणत्या समारंभाला साडी घालायची आहे हे ध्यानात ठेऊन साडी निवडावी.

 

-मोहिनी घारपुरे-देशमुखघरात एखादा समारंभ असेल, छोटा मोठा कार्यक्रम असेल तर जेवढी तयारी आणि विचार त्या कार्यक्रमाचा करावा लागतो तितकाच विचार त्या विशिष्ट प्रसंगाला काय घालायचं याचा करावा लागतो. त्यात जर साडी नेसण्याची आवड असेल आणि साडी नेसण्याची संधी असेल तर मग आपल्या आणि इतरांच्या लक्षात राहिल अशीच साडी शोधण्याचा अनेकींचा प्रयत्न असतो. कार्यक्रमासाठी शॉपिंग ही कल्पना तर आता खूप रूढ होते आहे. साडीची शॉपिंग करताना तर मग हटके साडी शोधण्याचाच प्रयत्न असतो. हल्ली तर पारंपरिक प्रकारात डिझायनर साड्या मिळू लागल्यामुळे प्रत्येकीच्या वाट्याला खास साडी येईल हे नक्की.

 

काठापदराच्या, जरीच्या साड्यांइतक्याच या डिझायनर साड्या फार सुंदर दिसतात. फक्त आपल्या व्यक्तिमत्त्वावर खुलून दिसेल अशा पद्धतीचे वर्क, डिझाईन यांची निवड करणं फार महत्त्वाचं ठरतं. जर योग्य डिझायनर साडीची निवड केली गेली नाही तर ऐन कार्यक्रमाप्रसंगी तुमचा लूक साडीनं उठून दिसण्यापेक्षा केवळ साडीमुळेच फसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे थोडीशी कल्पकता वापरूनच डिझायनर साडी निवडायला हवी.

कॅटलॉग पीस

बाजारात कॅटलॉग पीस म्हणून मोठ्या प्रमाणात साड्या उपलब्ध आहेत . त्यामुळे तुम्हाला डिझायनर साड्यांमध्ये निवड करायला पुष्कळ प्रकार चोखंदळपणे पाहता येऊ शकतात. कांथा, फुलकारी, जरदोसी, राजस्थानी पॅचवर्क, कशीदाकारी, आरी, मिरर वर्क, लेदर वर्क, कुंदनवर्क अशा कितीतरी प्रकारात या साड्या बाजारात आणि आॅनलाईनही मिळतात.

या साड्यांचं कापड हीच या साड्यांची खासियत आहे.अत्यंत तलम, रेशमी, झुळझुळीत अशा प्रकारच्या कापडाची निवड या साड्यांसाठी केली जाते. या साड्या अत्यंत आकर्षक पद्धतीनं आणि अ‍ॅस्थेटीक सेन्स वापरून बनवल्या गेल्यानं यांच्या किंमतीही जास्त असतात. परंतु असं असलं तरीही साधारण दीड दोन हजारपासून या साड्या दुकांनामध्ये पहायला मिळतात. बंगळुरू, हैदराबाद, मुंबई येथे प्रामुख्यानं या साड्या तयार केल्या जातात. 

 

डिझायनर साड्या निवडताना..या साड्या खरोखरीच फारच सुंदर दिसतात, फक्त त्यांची निवड करताना हे काही मुद्दे लक्षात ठेवायला हवेत.* बटबटीत साडी आणि अत्यंत ग्रेसफुल साडी असे दोन महत्त्वाचे फरक या प्रकारच्या साड्यांमध्ये असतात. त्यांपैकी आपल्याला कोणत्या समारंभाला साडी घालायची आहे हे ध्यानात ठेऊन साडी निवडावी.* नेटचा पल्लू, वेल्वेट पल्लू हे देखील फार सुंदर दिसतात.* आभूषणांची निवड साडीच्या वर्कला अनुसरूनच करावी. म्हणजे साडी अधिक खुलून दिसते.* साडीवर हलके डिझाईन, एम्ब्रॉडरी असेल तर ब्लाऊज त्यापेक्षा अधिक वर्क असलेले घालावे. साधारणत: कॉन्ट्रास्ट मॅच होईल याकडे लक्ष द्यावं.