शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट दिसायचंय मग ‘पलाझो’ वापरा! उन्हाळा सरत आलाय तेव्हा पलाझोची हौस आताच करून घ्या!!

By admin | Updated: May 26, 2017 17:56 IST

पलाझो पॅण्ट्स ट्राय करा आणि आपल्या रोजच्या आउटफीटला एक ब्रेक द्या!

 

- मोहिनी घारपुरे - देशमुख

रोज रोज पंजाबी ड्रेस किंवा जीन्स नाहीतर लेगिन्स-जेगिन्स घालून वैतागला असाल तर पलाझो पॅण्ट्स  नक्की ट्राय करा आणि आपल्या रोजच्या आउटफीटला एक ब्रेक द्या!

हल्ली अनेक फॅशनेबल मॉडर्न तरूणींच्या वॉर्डरोबमध्ये हक्काचं थान मिळवलेली पॅण्ट म्हणजे पलाझो. पायघोळ अशी ही पॅण्ट कंबरेपासून पायाच्या टोकापर्यंत त्रिकोणी आकार घेत घोट्यापाशी चांगलीच रूंदावलेली असते. काहीशा तलम कपड्यांमध्ये ही पॅण्ट अधिक शोभते मात्र कॉटनमधील पलाझोलाही तितकीच पसंती मिळते हे विशेष. विशेषत: उन्हाळ्यातील फॅशनकरीता या पलाझोंची हमखास निवड केली जाते.

 

                   

साधारणत: 60 च्या दशकाच्या शेवटी आणि 70च्या दशकाच्या सुरूवातीला या पलाझोचा ट्रेण्ड रूजला. आपल्याकडे परवीन बाबी, झीनत अमान या अभिनेत्रींच्या काळात हा ट्रेण्ड आला. इतकं च नव्हे तर अनेक नटांनीही केवळ स्टाइल म्हणून काही चित्रपटात या पलाझोसदृश पॅण्ट्स वापरल्या आहेत असं दिसून येतं. मात्र पुरूषांपेक्षाही महिलांसाठीच्या पलाझोचा बॉटम अत्यंत सैल आणि मोठा असतो. विशेषत: कॉटन, क्रेप  किंवा सिल्कच्या स्लीव्हलेस किंवा थ्रीफोर्थ बाह्यांच्या कुर्ती या पलाझोजवर अधिक उठून दिसतात तसेच त्यावर गळ्यात जर एखादा स्मार्ट्सा स्टोल घेतला तर आणखीणच ऐटबाज लूक येतो.या पलाझोज आपल्याकडे अद्याप घराबाहेर घालण्यास मोठ्या संख्येनं महिलांनी फारशी पसंती दिली नसली तरीही घरातल्या कपड्यांमध्ये मात्र या पलाझो पॅण्टसला अग्रक्रम  दिला जातो. या पॅण्ट बाहेरही घालता येऊ शकतात फक्त त्या तितक्या नीटनेटक्या कॅरी करणंही अत्यावश्यक असतं अन्यथा सगळाच गबाळपंथी अवतार होतो.

 

                    

अनेक मुलींना मात्र घरातल्या घरात उठबस करायला या पलाझो पॅण्ट्सच बऱ्या वाटतात. असं असलं तरीही अलिकडे आॅनलाईन शॉपिंगच्या अनेक वेबसाईट्सवर पलाझो विविध आकर्षक कपड्यांमध्ये उपलब्ध आहेत, तसेच मोठ्या ब्रॅण्डेड शोरूम्समध्येही पलाझोचा एक वेगळा काऊण्टर पहायला मिळतो. या पलाझो हिवाळ्यात आणि पावसाळ्यात घालणं केवळ अशक्य असल्यान विशेषत: समर फॅशन म्हणूनच या लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात एखादी पलाझो वापरून पहायला हरकत नाही ... ,

नाही का ?