शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हॉल सजवायचाय हटके मग बीडसचे पडदे लावा! हे 5 प्रकारचे पडदे घराला एकदम ट्रेन्डी बनवतात!

By admin | Updated: May 9, 2017 17:43 IST

असंख्य डिझाईन्समध्ये उपलब्ध असणाऱ्या बीडसच्या पडद्यांमुळे आपलं घर उठून दिसलं नाही तरच नवल!

 

-सारिका पूरकर-गुजराथी

घरातील दरवाजे, खिडक्यांना पडदे लावायचे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते सिल्क, कॉटन, नेट फेब्रिकचे आकर्षक रंगातील, विविध डिझाईन्सचे पडदे. मात्र पडद्यांची ही संकल्पना थोडी बदलून पाहण्याची वेळ आली आहे. कारण अ‍ॅक्रेलिक बीड्स, लाकडी बीड्स, बांबू बीड्स, प्लॅस्टिक बीड्स, हातानं विणलेले वायरीचे गोफ यांचे पडदे बाजारात उपलब्ध आहे. हे पडदे दिसायला तर सुंदर दिसतात शिवाय एक क्लासिक लूकही सजावटीला देतात. असंख्य डिझाईन्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या पडद्यांमुळे आपलं घर उठून दिसलं नाही तरच नवल!

 

घर सजावटीसाठी बीडसचे पडदे कसे निवडाल?

१) घराचा हॉल जर मोठा असेल तर सोफ्याच्या मागच्या बाजूला हे पडदे लावून तुम्हाला पार्टिशन करता येईल. सोफ्यामागे हे पडदे लावताना तुम्हाला भिंतीचा आधार नसेल तेव्हा छतावर रॉड टांगून त्यावर हे पडदे अरेंज करता येतात. यात सहसा सुती धाग्यांच्या (फक्त दोरीच्या स्वरूपातील लडी) पडद्यांचा वापर केला तर छान दिसतात. लाकडी बीड्स टे्रण्डी फील देतात.

 

  

२) हॉलला जर सोफिस्टिकेटेड टच हवा असेल तर मेटल बीड्सचे पडदे लावावेत. कारण या बीड्सला छान चकाकी असते.या पडद्यांमुळे खोलीतील वातावरण देखील एकदम उत्साहपूर्ण राहतं.

३) टेरेस विंडो किंवा फ्लोअर लेंथ विंडो असेल तसेच ज्याठिकाणी प्रायव्हसीची गरज नसेल अशा खिडक्यांवर क्रिस्टल बीड्सचे फॅन्सी पडदे लावून फ्रेश लूक मिळवता येतो. मात्र हे पडदे संपूर्ण खिडकीभर असायला हवेत.

४) अ‍ॅल्युमिनियम चेनचे पडदेही आकर्षक रंगात, डिझाईन्समध्ये मिळतात. हे पडदे देखील तुम्ही पार्टिशन म्हणून वापरु शकता, किंवा ज्याठिकाणी सीटिंग अरेंजमेंट आहे त्यावर दोन्ही बाजूला कमानीच्या स्वरुपात हे पडदे लावता येतात.

५) घरच्या घरी एखादी पार्टी करायची असेल तर भिंतीवरही सिल्कचे पडदे लावून त्यावर बीड्स कर्टन बॅकड्रॉप म्हणून लावून सजावट करता येते. दारांवरही कमानीच्या आकारात ते लावता येतात.

 

                    

६) फ्लोअर लेंथ, शॉर्ट लेंथ अशा आकारात हे पडदे मिळतात. घरात कोणत्या ठिकाणी ते लावायचे आहेत, त्याप्रमाणे त्याची उंची ठरवावी. हे पडदे तुम्ही घरीही सहज बनवू शकता. बाजारात रेडिमेड क्रिस्टल बीड्स, पाईप्स मिळतात. ते नायलॉन दोऱ्यात ओवून सहज बीड्सचे पडदे बनवता येतात.

७) बेडरुममध्ये बेडच्या मागील भिंतीवर बीड्सचे पडदे लावून हटके हेडबोर्ड तयार करता येतो. हा हेडबोर्ड दिसायलाही शाही लूक देतो.

८) घरातील दरवाजांवर आणि कपाटांच्या दरवाजांवर बांबू बीड्सचे तसेच प्लॅस्टिक बीड्सचे पडदे लावण्याचा ट्रेण्डही लोकप्रिय होतोय. हा पर्याय कपाट सजविण्यासाठी बेस्टच आहे. एरवी डेकोरेशनच्या बाबतीत घरातील कपाटं थोडे दुर्लक्षितच असतात. नाही का!

 

                        

९) बाबूूंच्याच बीड्स, पाईप्सला आकर्षक रंगात रंगवून त्यापासून तयार केलेले अ‍ॅबस्ट्रॅक्ट, फ्लोरल डिझाईन्समधील पडदेही घर सजावटीत खूप लोकप्रिय आहेत, त्याचाही वापर घराला हटके लूक देण्यासाठी करता येतो.