शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

तेलकट त्वचेनं वैताग आणला का? आहारातल्या या बारा गोष्टी तेलकट त्वचेची समस्या सोडवू शकतात!

By madhuri.pethkar | Updated: September 13, 2017 19:06 IST

बाहेरून कितीही उपचार केले तरी तेलकट त्वचेचा प्रश्न सुटत नाही. उपचार करायचाच असेल तर मग तो पोटातून करायला हवा. काही भाज्या, फळं, डाळी अशा आहेत की ज्या नियमित आहारात असल्या तर तेलकट त्वचेचा प्रश्न हमखास सुटू शकतो. योग्य आहारामुळे त्वचेचे विकार दूर होतात. हे फक्त वाचण्यापुरतं नसून करून बघण्यासारखंही आहे.

ठळक मुद्दे* त्वचेसाठी काकडी उत्तम असते.* हिरव्या भाज्यांमध्ये अजिबात तेल घटक नसतो.* नारळ पाण्यामुळे त्वचा ओलसर राहाते. तसेच नारळ पाण्यामुळे त्वचा स्वच्छही राहाते.

माधुरी पेठकर‘माझी त्वचा तेलकट आहे’ हे सांगतांना अनेकींच्या कपाळावर आठ्या पडतात. कारण तेलकट त्वचेमुळे येणाºया अनेक प्रश्नांना तोंड देता देता त्या मेटाकुटीस आलेल्या असतात. मुरूम, पुटकुळ्या, त्वचेचा दाह, डाग अशा एक ना अनेक समस्यांना तेलकट त्वचेमुळे तोंड द्यावं लागतं. बाहेरून कितीही उपचार केले तरी तेलकट त्वचेचा प्रश्न सुटत नाही. उपचार करायचाच असेल तर मग तो पोटातून करायला हवा. काही भाज्या, फळं, डाळी अशा आहेत की ज्या नियमित आहारात असल्या तर तेलकट त्वचेचा प्रश्न हमखास सुटू शकतो. योग्य आहारामुळे त्वचेचे विकार दूर होतात. हे फक्त वाचण्यापुरतं नसून करून बघण्यासारखंही आहे. आणि प्रश्न सुटणार असेल तर हे करून पाहायलाच हवंहे अवश्य खा!1) काकडीत्वचेसाठी काकडी उत्तम असते. काकडीत भरपूर प्रमाणात पाणी असतं. यामुळे त्वचा ओलसर राहाते. त्वचा ओलसर राहिली की आपोआपच ती थंडही राहाते. आणि यामुळे त्वचेवर तेल जमा होत नाही. काकडीत त्वचेला उपयुक्त अ‍ॅण्टिआॅक्सिडंटसही असतात.2) काजू

तेलकट त्वचा असलेल्यांनी रोज काजू खावेत. काजूमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडस असतात. हा घटक त्वचेतील अतिरिक्त तेलावर लगेच परिणाम करतो. 

 

3) संत्री-मोसंबी

ही आंबट फळं असतात. या आंबट फळांमध्ये क जीवनसत्त्व असतं. शिवाय या फळांमध्ये त्वचेतील विषारी घटक काढून टाकण्याचं सत्वं असतं. या विषारी घटकांबरोबर्च त्वचेतलं अतिरिक्त तेलही ही फळं काढून टाकतात.

4) हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांमध्ये अजिबात तेल घटक नसतो. उलट या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात तंतू असतात. जे पोटात गेल्यानं पोट साफ राहातं. पोट साफ असलं की त्वचाही चांगली राहाते. पोट साफ नसेल तर त्वचेवर जास्तीचं तेल निर्माण होतं.

5) मसूर आणि इतर डाळी

मसूरमध्ये त्वचेला आवश्यक पोषक घटक असतात. मसूर आणि इतर डाळी जर आहारात रोज असतील तर त्या त्वचेवर जे तेल निर्माण होतं त्याचं नियंत्रण करतात. शिवाय डाळींमुळे त्वचेतल्या तेलाचं संतुलन राखलं जातं. डाळी जर योग्य प्रमाणात पोटात गेल्या तर त्वचेवर तेल कमी जास्त निर्माण होत नाही. डाळींमध्ये प्रथिनं असतात. शिवाय ते अमिनो अ‍ॅसिडची निर्मिती करतात. अमिनो अ‍ॅसिडमुळे त्वचेत तेल निर्माण करणारी साखर नियंत्रित राहाते. 

 

6) पूर्ण धान्य

गहू, ज्वारी, बाजरी, नागली, मका या पूर्ण धान्यात मोठ्यप्रमाणावर तंतूघटक असतात. ही धान्य योग्य प्रमाणात आहारात असतील तर चयापचयक्रिया योग्य होते. त्यमुळे आम्लामुळे त्वचेवर येणारी पुरळ, दाह यासारख्या समस्या होत नाहीत. 

7) ब्रोकोली

ब्रोकोली या भाजीत मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असतं. हे जीवनसत्व मानवी शरीरात सहज शोषलं जातं. या जीवनसत्त्वाम्ळे त्वचेतील तेल नयंत्रित राहातं. तेल नियंत्रित राहिलं की मुरूम, पुटकुळ्या यासारख्या समस्या निर्माण होत नाहीत.

8) कच्च्या भाज्या आणि फळंकच्च्या भाज्या आणि ताजी फळं ही आरोग्यासाठी उत्तमच असतात. तशीच ती त्वचा निरोगी राहाण्यासाठीही उपयुक्त असतात. कच्च्या भाज्या आणि ताजी फळं सेवन केल्यानं पचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. पचनाची समस्या उद्भभवली नाही तर मग त्वचेवर अतिरिक्त तेलही निर्माण होत नाही.

9) डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटची फक्त चवच छान असते असं नाही. तर हे डार्क चॉकलेट हे त्वचेसाठीही उत्तम असतं. डार्क चॉकलेटमध्ये असलेल्या अ‍ँण्टिआॅक्सिडंट या घटकांमुळे मुरूम, पुटकुळ्या आणि त्यामुळे निर्माण होणारा दाह होत नाही. 

 

10) नारळ पाणी

नारळ पाण्यामुळे त्वचा ओलसर राहाते. तसेच नारळ पाण्यामुळे त्वचा स्वच्छही राहाते. नारळपाणी त्वचेवर तेल निर्माण करणा-या घटकांना रोखतं म्हणून नारळ पाणी नियमित प्यावं.

11) लिंबू

लिंबू हे त्वचेसाठी उपयुक्त फळ आहे. लिंबामुळे त्वचा स्वच्छ राहाते. लिंबू त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेतं. लिंबामुळे त्वचा मऊ आणि उजळ होते. लिंबू पोटातून घेणं जेवढं फायदेशीर तितकंच ते थेट चेहे-यावर लावणंही फायदेशीर ठरतं. 

12) केळ

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही रोज एक केळ खायला हवं. केळामध्ये फॉस्फेट, पोटॅशिअम आणि इ जीवनसत्त्व असतं. हे सर्व घटक त्वचा उजळ ठेवण्यास मदत करतात. केळामध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणारे घटक असतात. केळामुळे त्वचेवरील छिद्र बंद राहातात. त्यामुळे धूळ , घाण यापासून त्वचेचं संरक्षण होतं.