शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

मॉर्डन घरांना एथनिक टच द्यायचा कसा?

By admin | Updated: April 10, 2017 16:46 IST

मॉर्डन स्टाइलच्या घरांमध्ये हॉलपासून बाथरूमपर्यंत सर्व जागांना एथनिक लूक देता येतो

- सारिका पूरकर-गुजराथीमॉर्डन स्टाइलच्या घरांमध्ये हॉलपासून बाथरूमपर्यंत सर्व जागांना एथनिक लूक देता येतो. त्यासाठी खूप काही वेगळं नाही तर एथनिक निवडावं लागतं इतकंच! चायनीज, इटालियन फूड कितीही खाल्लं तरी आपल्या वरण-भाताची सर त्यास येत नाही हेचं खरं. हेच सत्य आपल्या घराच्या सजावटीच्या बाबतीतही आहे. घर सजवण्यासाठी कितीही लेटेस्ट ट्रेण्ड ट्राय केले तरी ट्रॅडिशनल, एथनिक, भारतीय परंपरेचे प्रतिबिंब असलेली सजावट घराला काही वेगळाच चार्म देते. या चार्मसाठी वेगळे काही नाही तर एथनिक प्रयत्न करावे लागतात इतकंच. पारंपरिक भारतीय सजावटीत लाकूड आणि माती या दोन घटकांचा वापर जास्त आढळतो एवढं साधं सूत्र लक्षात ठेवायचं. एथनिक सजावट १) एथनिक सजावट करताना बैठकी खोलीचा पहिल्यांदा विचार करु या. या खोलीत भारतीय बैठक वापरा, यात शक्यतो लो सीटेड दिवाण (ज्याची उंची जमिनीला स्पर्श करणारी असते) ठेवा. आता तर थेट खाली नुसती गादी अंथरुन, त्यावर आकर्षक बेडशीट, पिलोज ठेवण्याचाही ट्रेण्ड आहे. लो सीट दिवाणानंतर कुशन्सवर पारंपरिक भरतकाम, ब्लॉक प्रिंट, जयपूरी प्रिंटचे पिलो कव्हर घाला. झालंच तर काश्मिरी गालिचा, सतरंजी दिवाणखान्याच्या मध्यभागी अंथरा. आणि हो, जागा असेलच तर भारतीय पद्धतीचा झुला हवाच! २) दिव्यांचा वापर करताना पारंपरिक पद्धतीचे कंदील दिवाणखान्यात टांगू शकता. ३) काही अ‍ॅण्टिक शो पीसेस ठेवूनही सजावट करता येते. कोनाडेंचा (पूर्वी भिंतींमध्येच फळ्या ठोकून किंवा आतील बाजूनं मोकळी जागा सोडून वस्तू ठेवण्यासाठी जागा बनवत) लूक हवा असेल तर लाकडी चौकडी भिंतीवर बसवून त्यात वस्तू ठेवता येतात. ४) मॉड्यूलर किचनच्या जमान्यातही भारतीय परंपरेची झलक किचनमध्येही दाखवता येते. त्यासाठी जुनी तांब्या-पितळाची, लाकडी भांडी असतील तर ती स्वच्छ करुन आकर्षकरित्या मांडून ठेवता येतात. . काही भांडी ठेवण्यासाठी लाकडी कपाटं स्वयंपाकघरात ठेवता येता. चटणी-मीठ सर्व्ह करण्यासाठी चिनी मातीची भांडी ठेवता येतात. ५) वेताच्या बास्केट्स, परड्या यांचा वापर डायनिंग टेबलवर फळं ठेवण्यासाठी करु शकता. मातीच्या माठावर, रांजणावर वारली पेंटिंग करुन त्यास आणखी आकर्षक बनवून मांडता येतं. ६) स्वयंपाकघराचं छत वूडन पॅनलचं बनवता येतं. ७) बाथरुममध्येही भारतीय परंपरेचा वारसा जपता येतो. आंघोळीकरिता तांब्याचं गंगाळं ठेवता येतं. कपडे अडकवायला लाकडी खुंटी आकर्षकरित्या लावता येतं. साबण, वॉशिंग पावडर ठेवण्यासाठी पारंपरिक डिझाईनचे लाकडी केबिन मस्त दिसतात. ८) बेडरुममध्ये पारंपरिक पद्धतीचा लाकडी, उंच, चार खांब असलेला पलंग ठेवून त्यावर झालर असलेले बेडशीट घालून बेडरूमला एथनिक लूक देता येतो. ९) जयपूरी प्रिंटचे पडदे, काही पारंपरिक सिल्कचे, हातमागावर विणलेले पडदे लावूनही या इ्थनिक लूकसाठीच्या पर्यायांमध्ये भर घालता येते.