शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रस्त्यावरच त्याने मिळवला जॉब...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 05:28 IST

कॅलिसनची सर्व कैफियत मार्टिनने फेसबुकवर पोस्ट केली. ती वाचून ‘पिज्झा रॉक्स’ हॉटेलमधून त्याच्यासाठी जॉब आॅफर आली. 

जागतिक मंदीच्या लाटेमध्ये अनेकांना नोकरी गमवावी लागली. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असतान जर नोकरी नसेल तर कसे व्हायचे, या विवंचनेत अनेकजण ना उमेद होऊन जातात. पण फ्रेड्रिक कॅलिसन हताश झाला नाही.वॉशिंग्टनमधील ‘स्मार्ट अँड फायनल’ दुकानासमोरील रस्त्यावर तो गेली दोन वर्षे बेघर म्हणून राहतोय. पण तो कोणी भिकारी नसून जॉबचा शोध घेत आहे.आता तुम्ही म्हणाला जॉब शोधायचा तर आॅफिसेसला खेटा मारायच्या सोडून तो तिथे बसून काय करतोय? पण तो नुसता बसेलेला नव्हता. त्याचे रेझ्युमे व्यवस्थितपणे मांडून तो कोणीतरी त्याला नोकरी देईल या आशेवर वाट पाहत होता.

This homeless man was sitting outside of Smart and Final NOT asking for money. His sign said "Need work, and hungry" not...

Posted by Michael Marteen on Thursday, February 25, 2016
अखेर त्याचा आशावाद कामी आला. शॉपिंग करून बाहेर पडल्यावर मायकल मार्टिनला कॅलिसन रस्त्यावर रेझ्युमे मांडून बसलेला दिसला. उत्सुकते पोटी त्याच्याशी बोलल्यानंतर त्याला त्याची परिस्थिती कळाली आणि त्याला मदत करण्याचे त्याने ठरवले.मार्टिन सांगतो, केवळ एका स्लिपिंग बॅगवर तो राहत होता. ‘काम आणि अन्न पाहिजे’ असा बोर्ड त्याने लिहिलेला होता. एवढेच नाही तर त्याची सर्टिफिकेट्स, सोशल सेक्युरिटी कार्ड आणि ओळखपत्रदेखील समोर ठेवले जेणेकरून तो कोणी फ्रॉड नाही हे कळेल. तो आचारी होता. ‘सॅलव्हेशन आर्मी’साठी काम करण्यासाठी तो वॉशिंग्टनमध्ये आला होता. मात्र, काही कारणामुळे त्याला नोकरी सोडावी लागली आणि तो रस्त्यावर आला.कॅलिसनची सर्व कैफियत मार्टिनने फेसबुकवर पोस्ट केली. ती वाचून ‘पिज्झा रॉक्स’ हॉटेलमधून त्याच्यासाठी जॉब आॅफर आली. हॉटेलने त्याला कपडे आणि एका मित्राने राहण्यासाठी तात्परुती जागा दिली. जीवनाला अशी सकारात्मक कलाटणी मिळाल्यामुळे कॅलिसन खूप खूश आहे. कोणाचे आयुष्य कसे वळण घेईल कोण सांगू शकेल, नाही का?