शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

१० मिनिटं आहेत? - मग पटकन झटका चेहऱ्यावरची मरगळ!

By admin | Updated: June 23, 2017 18:01 IST

दिवसभराच्या थकव्यानं उतरलेल्या चेहऱ्यावर घरच्या घरी प्रसन्न जादू करता येवू शकते.

नेहा चढ्ढाएकेक दिवस असा उजाडतो की कामं संपत नाहीत. उन्हात भटकावं लागतं. कामाचा डोंगर, चिडचिड. जेवणाची वेळ टळून जाते. त्यात डोळे चुरचुरतात. चेहरा निस्तेज दिसू लागतो. आपल्या मनावर आलेली मरगळ चेहऱ्यावरही दिसू लागते. चेहरा कोरडा, अगदीच डल दिसू लागतो. आपण चेहऱ्यावर पाणी मारतो. लोशन्स चोपडतो. पण कसलं काय, चेहरा अत्यंत निस्तेजच दिसतो. बरं एवढं करुन आपल्याला घरीच रहायचं असेल तर ठीक आहे. पण त्याचदिवशी एखादं लग्न असेल, कुणाकडे जेवायला जायचं असेल, घरी पाहुणे येणार असतील तर? मग आणखीच वैताग येतो की आजच आपण असे निस्तेज दिसतोय. काय करणार? मुख्य म्हणजे चेहऱ्यावरचा थकवा कसा घालवणार? त्याचं उत्तरं शोधलं तर ते आपल्या किचनमध्येच आहे. फक्त गरजेप्रमाणे ५ ते ३० मिनिटं आपण स्वत:साठी काढायला हवीत. आणि हे उपाय फक्त बायकांसाठी नाहीत,पुरुषही ते करुच शकतात.

 

१) बटाटा बारीक किसून मिक्सरध्ये पेस्ट होईपर्यंत फिरवायचा. ती पेस्ट चेहऱ्याला फक्त ३० मिनिटं लावून ठेवायची. काळपटपणा, कोरडेपणा निघून जातो. चेहऱ्याला तकाकी येते.

२) अननसाचा गर आणि मध एकत्र करुन चेहऱ्याला लावावं. हा लेप फक्त १० मिनिटं चेहऱ्याला, मानेला लावला तरी चेहरा सतेज होतो.

३) पपईचा गर+मुलतानी माती+मध हे समसम प्रमाणात घेवून चेहऱ्याला लावावं. १० मिनिट ठेवावं. मऊ, चमकदार दिसतो चेहरा.

४) काकडीचा गर आणि दही एकत्र करुन चेहऱ्याला लावावं. दहा मिनिटं ठेवावं. हा लेप हाताला, कोपरांना, गुडघ्यांना, घोट्याच्या इथं काळवंडलं असेल तर तिथंही लावता येतो. गार वाटतं आणि काळपटपणा कमी होतो.