हर्द कौरचा दारू पिऊन 'ब्लास्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:08 IST
पॉप सिंगर व रॅपर हर्द कौर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
हर्द कौरचा दारू पिऊन 'ब्लास्ट'
पॉप सिंगर व रॅपर हर्द कौर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लुधियानामधील एका रेस्टारेंटमध्ये आयोजित कार्यक्रमात तिने घातलेल्या धिंगाणा लोकांसाठी त्रासदायक ठरला. करवां चौथच्या निमित्ताने आयोजित 'ब्लॉस्ट बिफोर द फास्ट' कार्यक्रमात मनोरंजनासाठी हर्दला बोलाविण्यात आले होते. हर्द परफार्म करत असताना काही मुले तिच्यासोबत डान्स करण्यासाठी स्टेजवर आली. यामुळे संतापलेल्या हर्दने त्यांच्याशी गैरवर्तन सुरू केले, तिने आपला मायक्रोफोन प्रेक्षकांच्या दिशेने भरकावून दिला.