शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हॉल सजवा आपला आपणच!

By admin | Updated: April 7, 2017 19:19 IST

जेव्हा आपला हॉल आपण आपल्या डोक्यातल्या कल्पनांना कामाला लावून आपल्या हातानं आणि मनानं सजवतो तेव्हा तो नुसताच देखणा नाहीतर जिवंत आणि बोलका होतो.

- सारिका पूरकर-गुजराथी.माझ्यातल्या क्रिएटीव्हीटीचं कोणाला काय वाटतंच नाही असा चडफडाट लहानांपासून मोठयांपर्यंत अनेकजण करतात. पण आपल्यातल्या क्रिएटीव्हीटीची चाड कोणाला असो की नसो पण एका ठिकाणी या क्रिएटीव्हीटीची खरोखर गरज असते. पण ती हाक आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. अर्थात आपल्या घराचा दिवाणखाना म्हणजेच हॉल हो. ही एक अशी जागा आहे जिथे आपल्यातल्या क्रिएटीव्हीटीला भरपूर स्कोप असतो. आपलं घर आपल्याला एक व्यासपीठे मिळवून देतं असतं म्हणून ती संधी आपण का नाकारावी?आपलं घर सजवण्याच्या विविध कल्पना आपण घरबसल्या लढवू शकतो आणि त्या लगेच करूनही बघू शकतो. यामुळे दोन फायदे होतात. एकतर आपल्यातल्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपलं घर सुंदर दिसतं. घरात इतर कोणत्याही खोलीपेक्षा दिवाणखाण्याला (हॉलला) सजावटीची गरज असते. मग तो मोठा आहे की एकदम छोटा हा मुद्दा नसतोच. तो कसाही असो फक्त तो छान दिसायला हवा. बाहेरच्या वस्तू आणून घर सजवता येतं. पण आपल्या हाताला आणि डोक्याला कामाला लावलं तर तो आणखीनच छान दिसतो. घरातला हॉल आपल्या हातानं सजवण्याच्या अनेक युक्त्या आहेत. १) सध्या फ्लोरल प्रिंट्सची चलती आहे. या फ्लोरल प्रिंट फेब्रिकचा वापर सोफ्यासाठी, हॉलमधील पडद्यांकरिता करू शकता. यामुळे हॉलला एकदम फ्रेश लूक मिळेल. यासाठी अट मात्र एकच की आपण निवडू ते फेब्रिक ब्राईट आणि सॉफ्ट लूक देणाऱ्या रंगाचं हवं. शक्यतो खूप मोठे प्रिंट्स वापरु नका. २) हटके लूक हवा असेल तर स्ट्रिप्ड फेब्रिक बेस्ट आॅप्शन आहे. पडदे, रग, कुशन्स, सोफ्याचे कापड स्ट्रिप्ड प्रिंटचे वापरु शकता. याच्या रंगसंगतीवर मात्र विशेष लक्ष द्यावं लागेल. पॅरट ग्रीन सोफ्यासाठी, लाईट आॅरेंज आणि लाईम कुशन्ससाठी, लाइट रेड रगसाठी आणि पडद्यांसाठी मिडियम ग्रीन वापरुन पाहा. नक्कीच फ्रेश लूक मिळेल.३) व्हायब्रंट लूकचा जमाना आहे हा, मग बैठक खोलीची सजावटही त्यास अपवाद नाही. एरवी बैठक खोलीतील टीव्ही स्टॅण्ड पारंपरिक वूड कलर फिनिशचेच असत, आपण मात्र त्यास व्हायब्रंट लूक देऊ शकता. हाय ग्लॉस बोल्ड कलर्सनं ही स्टॅण्ड, टेबल्स रंगवून टाका मग. त्यासाठी सॅण्ड पेपरनं ते आधी घासून घ्या. प्रायमरचा हात द्या नंतर रंग लावा.४) घरातील छोटी कपाटं केबिन्स देखील निआॅन रंगात रंगवून त्यांनाही कलरफूल बनवता येतं.५) बैठकीच्या खोलीत फ्लॉवरवासे नेहमीच अरेंज केले जातात. मात्र या वासेंचेही लूक बदलले पाहिजे ना आताच्या ट्वेन्टी-ट्वेन्टीच्या जमान्यात. त्यासाठी एकच मोठा वासे आणि त्यात फुलं ही टिपिकल रचना टाळा. त्याऐवजी क्लिअर ग्लास बॉटल्स (विविध आकाराच्या, उंचीच्या) घेऊन त्यात एक-एक, दोन-दोन मोठ्या दांडीचे फुले ठेवा. हा लूक एकदम वेगळा वाटतो. ६) गो नॅचरल हा मंत्रा सजावटीसाठीही वापरा. शंख, शिंपले, पेबल्स, झाडांच्या फांद्या, पानं यांचा कल्पकतेनं वापर करुन हॉल देखणा करता येतो.७) बैठकीच्या खोलीत साइड टेबलवर आकर्षक लॅम्पशेडही तुमच्या खोलीच्या सजावटीत भर घालतो. त्यासाठी शक्यतो लॅम्पशेड पार्चमेंट, पांढऱ्या रंगात असेल तर बेस्टच. सध्या अनेक लॅम्पशेड्सचे प्रकार उपलब्ध आहेत, ते देखील ट्राय करायला हवेत.