शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

​Gudi Padwa 2017 : गुढी उभारु... नवचैतन्याची !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 13:09 IST

नवचैतन्याला प्रेरक ठरणाऱ्या, मरगळलेल्या, अनुत्साहित मनांना जागवणाऱ्या या सणानिमित्त नवचैतन्याची गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करुया.

-Ravindra Moreनववर्षाचा पहिला दिवस म्हणून चैत्र प्रतिपदा साजरी केली जाते ती गुढी उभारुन. या दिवसाला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीने खूप महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून नवचैतन्याला प्रेरक ठरणाऱ्या, मरगळलेल्या, अनुत्साहित मनांना जागवणाऱ्या या सणानिमित्त नवचैतन्याची गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करुया.गुढीपाडवा असा साजरा करावागुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्रण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.नववर्षाच्या शुभारंभी येणारा पाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी व्यापारी, दुकानदार, कारखानदार, विक्रेते त्यांच्या कायार्चा शुभांरभ करतात. इमारतीची पायाभरणी, उद्घाटन, गृहप्रवेश अशी अनेक शुभकार्ये या मुहूर्तावर पार पडतात. विशेष म्हणजे या शुभमुहूर्तावर केलेले नवे संकल्प पूर्णत्वास जातात. गुढी म्हणजे नव्या वर्षाची, नव्या संकल्पांचीही सुरुवातच असते. गुढीसाठी वापरलेली आंब्याची किंवा कडूलिंबाची डहाळी म्हणजे जीवनधाराच मानली जाते. मांगल्याचं, हिरवाईचं, सृजनाचं ते प्रतीक, गुढीचं चांदीचं पात्र म्हणजे जीवनरस साठवून तो ग्रहण करण्याचं साधन, गुढीसाठी वापरलेलं रेशमी वस्त्र म्हणजे आपलं संरक्षण, आपली संस्कृती. गुढीवर लटकवलेली साखरेच्या गाठ्यांची माळ म्हणजे जीवनातल्या गोडीचं प्रतीक असते. गुढी उभारायची ती प्रात:काली! उतरवायची ती सूर्यास्तावेळी! गुढीपाडव्याच्या दिवशी कडूलिंबाचे फार महत्त्वाचे स्थान असते. दुधात कडूलिंबाची पाने कुस्करुन देवाला नैवेद्य दाखवायचा आणि प्रसाद म्हणून तो घ्यायचा. आयुर्वेदातलं कडूलिंबाचं महत्त्व जाणून केलेली ही योजना! आरोग्यदायी कडूलिंब वषार्रंभीच पोटात गेला तर रोगपरिहार होऊन जीवन झळाळून उठते. कडूलिंबाच्या पानांबरोबर हिंग, जिरे, मीठ, ओलं खोबरं वाटून तो गोळा खाण्याचीही प्रथा आहे. गुढीपाडव्याच्या गोड दिवशी कडू चवीचा कडूलिंब खाण्याचा हेतू एकच. वषार्रंभाची सुरुवात आरोग्यदायी! या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी घरातील कुटुंबीय एकत्र बसून मिष्टान्नाचा आस्वाद घेतात. कोणत्याही शुभकायार्साठी मुहूर्तवेळ पाहताना पंचांगकत्र्यांनी सांगितलेले साडेतीन मुहूर्त विचारात घेतले जातात. त्या दिवशी संपूर्ण वेळ शुभघटिकाच असते.