शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

GOOD NEWS : ​गुढीपाडव्यापासून हेलिकॉप्टरमधून मुंबई दर्शन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 11:34 IST

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी असून गुढीपाडव्यापासून हेलिकॉप्टरमधून मुंबई दर्शनाचा आनंद हवाई सफरीने घेता येणार आहे.

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी असून गुढीपाडव्यापासून हेलिकॉप्टरमधून मुंबई दर्शनाचा आनंद हवाई सफरीने घेता येणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि पवनहंस यांनी नुकताच यासंदर्भात सामंजस्य करार केला असून मुंबई विद्यापीठातील हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरने या जॉयराईडचा आनंद घेता येणार आहे. तसे पाहिले तर मुंबईमध्ये लोकलने प्रवास करून कमी खर्चात मुंबई दर्शन करता येते मात्र हवाई सफरने प्रवास करणे काही औरच असते. पण यासाठी प्रत्येकी ३ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.  सर्वसामान्यांना जरी ही सफर महागडी ठरणार असेल तरी या तिकिटावर विद्यार्थ्यांना दहा टक्के आणि सामाजिकदृष्ट्या वंचित गटातील विद्यार्थ्यांना २५ टक्के सवलत असेल. ही हवाई सफर दररोज नाहीतर दर रविवारी आयोजित केली जाईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी दिली. त्यामुळे या हवाई सफरीला मुंबईकरांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.