शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

Good News : आधार कार्डमध्ये चुक किंवा अपूर्ण माहिती असेल तर असे करा घरीच अपडेट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 18:17 IST

या सोप्या पद्धती वापरून आपण आॅनलाइन आपल्या आधार कार्डामध्ये करेक्शन करु शकता.

-Ravindra Moreसरकारने बॅँक अकाउंट आणि पॅन कार्ड सारख्या आवश्यक सुविधांसाठी आधार कार्डला अनिवार्य केले आहे. त्यामुळे सर्वांचेच आधार कार्ड असणे गरजेचे आहे. जर आधार कार्ड बनविलेले असेल तर त्यातील माहिती अचुक आहे का याची खात्री करुन घ्या. जर त्यात दिलेली माहिती चुकीची असेल तर त्या माहितीला दुरुस्तही करु शकता. यासाठी आपणाजवळ दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे आपण जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन करेक्शन क रु शकता. ज्या माहितीची दुरुस्ती करायची आहे, त्यासंबंधीचे कागदपत्रे मुळप्रतित सोबत असणे आवश्यक आहे. दुसरा पर्याय म्हणजे आपण आॅनलाइन आपल्या आधार कार्डामध्ये दुरुस्ती करु शकतो.    आॅनलाइन दुरुस्तीसाठी आपणास सर्वप्रथम आधारच्या आॅफिशियल वेबसाइटला भेट द्यावी. साइटवर गेल्यानंतर ‘आपकी आधार’ वर क्लिक करावे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेचच एक पेज ओपन होईल. त्या पेजच्या खाली डाव्या बाजूला ‘अपडेट युवर आधार डेट’ वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ‘अपडेट डाटा आॅनलाइन’ लिंक दिसेल. या पेजवर आपणास आधार नंबर टाइप करावा लागेल. आधार नंबर टाकल्यानंतर आपला मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर या मोबाइल नंबरवर एक ‘ओटीपी’ येईल. या ‘ओटीपी’ला निर्धारित जागेवर भरल्यानंतर आपले लॉगिन होईल.         यशस्वीरित्या लॉगिन झाल्यानंतर ‘डाटा  अपडेट रिक्वेस्ट’वर क्लिक करुन आपल्या माहितीत बदल करु शकता. आपण ज्या माहितीत बदल करीत आहात, त्या संबंधीचे कागदपत्रेदेखील अपलोड करावे. दुरुस्ती आणि कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर ‘सबमिट’चे बटन क्लिक करावे. सबमिट केल्यानंतर ‘अपडेट स्टेटस’ वर जाऊन आपला आधार नंबर आणि यूआरएन टाका. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ‘युवर रिक्वेस्ट कंप्लिट सक्सेसफुली’ दिसेल. हा मॅसेज दिसल्यानंतर आपण साइन आउट करू शकता.  या सोप्या पद्धती वापरून आपण आॅनलाइन आपल्या आधार कार्डामध्ये करेक्शन करु शकता.