घरच्या घरी मेकअपचे नऊ नियम पाळा आणि पार्लरला जावून मेकअप करण्याचा खर्च वाचवा! मेकअप हा सर्वच बायकांना करावासा वाटतो. मग त्या नोकरदार असो नाहीतर गृहिणी. पण मेकअप म्हटला की तो पार्लरमध्येच जाऊन करायला पाहिजे असं नाही. मेकअपचा स्वत:मधला सेन्स थोडा वाढवला तरी घरच्याघरी मेकअप चांगला जमतो. नुसत्याच छोट्या प्रसंगासाठी नाही तर मोठ्या सण समारंभानाही तयार होताना मेकअपसाठी पार्लरमध्ये जावं लागत नाही.यासाठी मेकअप करताना फक्त नऊ गोष्टी जमायला हव्यात.
घरच्याघरी मेकअपचे नऊ नियम
1) मेकअप म्हणजे छान नटणं-थटणं असं खूपजणींना वाटत असल्यामुळे मेकअप करून बाहेर जाणं अथवा मुलांच्या शाळेतील मिटिंगसाठी म्हणून मेकअप करणं ही कल्पना तितकीशी पटत नाही. पण मेकअप ही बदलत्या काळाची गरज आहे आणि त्याच जोडीला मेकअपमुळे व्यक्तिमत्त्व आणि बाह्य सौंदर्य खुलून दिसतं. आपला आत्मविश्वास वाढतो. छान वाटतं स्वत:विषयी! 2)मेकअप करायचा म्हणजे तो अगदी भडकच करायला हवा असं नसून आपल्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे करावा. योग्य मेकअप केल्यास तो केला आहे असं भासतही नाही; पण अशा मेकअपमुळे चारचौघीत आपण उठून मात्र दिसतो.मेकअप करताना आपली त्वचा, रंग, आवड आणि बाहेरचं वातावरण यासर्वांचा विचार करावा लागतो.
3) मेकअप करताना ऋतूमानाचं भान मात्र ठेवायलाच हवं. सध्या कडक उन्हाळा आहे त्यामुळे भर उन्हामध्ये कुठे जायचं असेल तर खूप भडक रंग वापरूनही चालत नाही. अशा वेळेस गुलाबी, पिच कलर अशा रंगाचे आयशॅडो, लिपस्टिक तसेच ब्लशआॅन वापरावेत. हे सर्व रंगही जर जास्त वाटत असतील तर ब्राउन कलर वापरावा. आणि ज्यांना रंग वापरणंच आवडत नसेल अथवा काही ठराविक कार्यक्रमांनाच रंग वापरावे असं वाटत असेल त्यांनी मेकअप म्हणून फक्त फाउंडेशन, आयलायनर, काजळ आणि लिपस्टिक एवढंच वापरलं तरी पुरे!
4) ओठांचा आकार लहान भासवायचा असेल तर ओठांच्या थोड्या आतल्या बाजूनं लिपस्टिक लावावी. जास्त लीपग्लॉसही लावू नये.
5) डोळ्यांचा आकार जर मोठा दाखवायचा असेल, तर डोळ्यांच्या क्रीजलाइनवर डार्क कलरची आयशॅडो लावावी, त्यानं डोळे मोठे दिसतात. तसेच जिवणी अथवा गालांचा आकारही ब्रॉशर लावून अथवा ब्राऊन पीच कलरचे ब्लशआॅन लावून कमी करता येतो. 6) बाजारात भरपूर मेकअपचं साहित्यही मिळतं पण खूपदा आपण पेचात पडतो की आपल्यासाठी नेमकं काय वापरावं? त्वचेच्या प्रकाराप्रमाणे अथवा रंगाप्रमाणे फाउंडेशन, लूज पावडर अथवा कॉम्पॅक्ट हे हवंच.
7) आयशॅडो पॅलेटमधे निदान पिंक, पिच, ब्राउन, ब्लॅक तसेच एखादा ब्लू अथवा ग्रीन रंग असायला हवा.
8) आयलाइनर, मस्कारा, काजळ पेन्सिल हे हवंच.
9) ब्लशआॅनमधे गुलाबी/पिच आणि ब्राउन कलर असायला हवा. आवडीप्रमाणे पिच पिंक, लाल, राणी कलरची लिपस्टिक ठेवायला हवी.