शहरं
Join us  
Trending Stories
1
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
3
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
4
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
5
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
6
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
7
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
8
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
9
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
10
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
11
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
12
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
13
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
14
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
15
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
16
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
17
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
18
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
19
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
20
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...

पाच वाईट सवयींचे अल्टिमेट फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:04 IST

आता तुम्ही म्हणाल की वाईट सवयींचे काय फायदे असू शकतात?

आता तुम्ही म्हणाल की वाईट सवयींचे काय फायदे असू शकतात? वाईट सवयी मोडण्यासाठी तर सगळे जण प्रयत्न करीत असतात. लहानपणीच याची ट्रेनिंग सुरू होते. समाजाच्यादृष्टीने काही सवयी या वाईट असतात. परंतु काही वाईट समजल्या जाणार्‍या सवयींचासुद्धा आपल्याला लाभ होऊ शकतो. तो कसा वाचा जरा.. 1. हातापायाची चुळबुळकाही जणांना लहानपणी एका जागी स्थिर बसलेच जात नाही. सतत हातापायाची चुळबुळ सुरू असते. त्यामुळे आईवडिलांचा मारही खावा लागतो. परंतु प्रौढ वयात हीच सवय आरोग्यासाठी लाभदायक ठरते. आजच्या डेस्क ऑफिसच्या युगात शरीराची हालचाल अगदीच नगण्य होऊन गेली आहे. त्यामुळे हातपायाची अशा प्रकारे केलेली हालचाल उपयोगी पडू शकते.2. रोज आंघोळ न करणेआंघोळ केल्याशिवाय बाहेर पडणेच बर्‍याच जणांना अशक्य वाटू शकते. पण आठवड्यातून एक-दोन दिवस आंघोळ न करणे त्वचेसाठी फायद्याचे असते. कारण साबणामुळे आपल्या त्वचेची नैसर्गिक मुलायमता नष्ट होते. त्याबरोबरच पृष्ठभागावर असणारे काही बॅक्टेरिआ अनेक त्वचारोगापासून आपले संरक्षण करत असतात. त्यामुळे आंघोळ न करणे म्हणजे फार मोठा गुन्हा नाही.3. गॉसिपसहकार्‍यांच्या चर्चेचा किंवा थट्टेचा विषय होणे कोणालाच आवडणार नाही. तसे पाहिले तर गॉसिप करणे वाईट समजले जाते. मात्र तुम्ही जर गॉसिप करत असाल तर तुमच्या आरोग्याला ते उपयुक्त आहे. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले की गॉसिप करतान महिलांमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स स्रवले जातात, ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होते. परंतु हे गॉसिप कुणासाठी मनस्तापाचे कारण ठरू नये.4. राग व्यक्त करणेछोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करणे नक्कीच चांगली सवय नाही. मात्र अधुनमधून तुम्हाला जे अयोग्य वाटते ते बोलून दाखवणे आरोग्यासाठी फार गरजेचे असते. ऑफिसमध्ये राग व्यक्त न करणार्‍या कर्मचार्‍यांना हृदयविकाराचा दोन ते पाच पट अधिक धोका असतो. पण याचा अर्थ असा नाही की उठसुठ इतरांवर राग काढावा. तसे करणे खरेच चुकीचे आहे.