शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेस गबाळा वाटतोय का? मग वरून श्रग घाला आणि स्मार्ट दिसा!

By admin | Updated: May 10, 2017 17:10 IST

कितीही गबाळा लूक कॅरी करत असलात तरीही एखादा स्मार्ट श्रग घातला की तुमचा लुक एकदम अपडेट होऊ शकतो.

 

-मोहिनी घारपुरे-देशमुख

कितीही गबाळा लूक कॅरी करत असलात तरीही एखादा स्मार्ट श्रग घातला की तुमचा लुक एकदम अपडेट होऊ शकतो.

एखाद्या दिवशी वॉर्डरोबमधलं नेमकं काय घालावं हेच लक्षात येत नाही. कितीही चांगले कपडे जवळ असले तरीही कधी ते नीट धुतलेले नसतात किंवा त्यांना व्यवस्थित इस्त्री केलेली नसते. मग अशावेळी नेमकी तारांबळ उडते. अगदी अशाच वेळी मदतीला धावतो तो श्रग.

 

            

हा श्रग घातला की कपडे आपोआपच काहीप्रमाणात झाकले जातात आणि त्यावरची नजर हटून सगळं लक्ष श्रगवरच केंद्रीत होतं. असा हा श्रग उन्हाळ्यात फारवेळ जरी घालवत नसला तरीही जॅकेटप्रमाणे थोडावेळ नक्कीच तारून नेऊ शकतो.

श्रग दोन प्रकारचे असतात. एक लांब, गुडघ्याच्यावरपर्यंत तर दुसरे शॉर्ट, म्हणजे वेस्टलाईनपर्यंत. अत्यंत आकर्षक असे हे श्रग सोनेरी, चंदेरी, काळ्या रंगात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अन्य रंगातही ते वेगवेगळ्या स्टाईलमध्ये उपलब्ध आहेत.

कधी लोकरीचे, कधी रफल्स असलेले, कधी पाठीमागे संपूर्णत: क्रोशावर्क, नीटेड असलेले अनेक प्रकार या श्रगमध्ये सापडतील. विशेषत: स्लीव्हलेस ड्रेस घातल्यानंतर बाहेर जाताना त्यावरून एखादा स्मार्टसा श्रग घातला तर फारच सुंदर, आकर्षक लुक येतो.

हे श्रग एखाद्या ओव्हरकोटप्रमाणेच असतात पण त्यांना समोरच्या बाजूला बटन्स नसतात. त्यामुळेच ते घालणं अत्यंत सोपं आणि सहज असतं.

                       

अलिकडे अनेक मुली आपल्या वॉर्डरोबमध्ये या श्रगला विशेष पसंती देऊ लागल्या आहेत.एखाद्या कार्यक्रमाला किंवा पार्टीला जाताना गोल्डन, सिल्व्हर आणि ब्लॅक कलरच्या श्रगलाच अधिक प्राधान्य दिलं जातं. त्यावर मोठ्या माळा, मोठ्या इअररिंग्स आणि स्टेलेटोज घातले तर एकूणच एक स्मार्ट लुक येतो.