शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्धीसाठी राष्ट्रगीताचा वापर नकोच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:57 IST

प्रसिद्धीसाठी राष्ट्रगीताचा वापर नकोच!आपल्या प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी प्रत्येकच जण जाहिरतीचा आधार घेत असतो. बॉलिवूडही याला अपवाद नाही. परंतु अशी जाहिरात करताना काही गोष्टींचे भान ठेवायला हवे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. प्रकाश झा यांच्या जय गंगाजल या सिनेमाच्या जाहिरातीसाठीही अशीच घोडचूक करण्यात आली आहे. पोलीस दलातील महिलांना मानवंदना असे सांगत प्रियांका चोप्रा, स्वत: प्रकाश झा आणि पोलिसांच्या वेशातील अन्य असे सर्व मिळून राष्ट्रगीत आहेत, असे यात दाखविण्यात आले आहे. राष्ट्रगीताचा आदर राखणे आणि ते सुरू असताना प्रत्येकानं उठून उभे राहणे हे आवश्यकच आहे. परंतु राष्ट्रगीताचा वापर गंगाजल या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी, प्रमोशनसाठी करावा का हा प्रश्न आहे. यावर सीएनएक्सने तरुणाईची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनीही या प्रकाराचा कडाडून विरोध केला. राष्ट्रगीत संपल्यानंतर जय गंगाजल अशी चित्रपटाची जाहिरातही याच व्हिडियोमध्ये दाखविण्यात आली आहे. राष्ट्रगीताचा असा व्यावसायिक कारणासाठी वापर करणं योग्य नाही. प्रकाश झा प्रॉडक्शनने देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी हा चित्रपट तयार केलाय की त्यांना ही भावना त्यांच्या फायद्यासाठी कॅश करायची आहे, असा रोखठोक प्रश्नही या तरुणाईने यावेळी विचारला.... ही तर गंभीर चूकजाहिरातीला विरोध नाही. परंतु कुठलीही जाहिरात करताना त्यातून वाद निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. राष्ट्रगीताबद्दल एक विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर करणे ही गंभीर चूक आहे. माझ्या मते झा यांनी प्रसिद्धपोटीच हा प्रकार केला असावा. त्यांनी त्वरित ही जाहिरात काढायला हवी.               - गुल्फशा कादरीजाहिरात लगेच बंद करायला हवीप्रत्येक भारतीयांसाठी राष्ट्रगीत हा अभिमानाचा विषय आहे. त्याचा वापर सिनेमाच्या प्रमोशनसाठी करणे योग्य नाही. कुणी याची दखल घेऊन दंडात्मक कारवाई करण्याआधी झा यांनी स्वत:हून ही जाहिरात मागे घ्यायला हवी. असे घडले नाही तर उद्या कुणीही उठेल अन् आपल्या प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी राष्ट्रगीताचा वापर करेल. हे कुणी कसे खपवून घ्यायचे. - सुरभी पुरोहितकुणाची परवानगी घेतली?राष्ट्रगीताचा वापर कुठे करावा, कोणी करावा याचे काही नियम आणि संकेत आहेत. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत वाजणे ही अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु खाजगी किंवा व्यावसायिक कामासाठी कुणी राष्ट्रगीताचा वापर करीत असेल तर त्याला विरोध व्हायलाच हवा. झा यांनी यासाठी कुणाची परवानगी घेतली ते स्पष्ट व्हायला हवे. राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.  - शुभांगी बोरीकरचित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी घालायला पाहिजे सिनेमाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर करण्यात येतोय आणि तरीही यावर अजून कोणीच काही बोलत नाही हे धक्कादायक आहे. कुठे गेल्या त्या संघटना ज्या देशाप्रती प्रेम असल्याचे मीडियाला सांगत असतात? ज्या गोष्टीला विरोध करायचा त्याला कुणी करीत नाही आणि भलत्याच गोष्टींवर आपले श्रम खर्च केले जातात. या जाहिरातीवरच नव्हे तर या चित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी घालायला हवी.   - पुनित रावलथेट गुन्हाच दाखल करायला हवा औरंगाबाद मध्ये २०१० साली महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पाच आणि एका अपक्ष नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच धरतीवर प्रकाश प्रकाश झा यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा. जेणेकरुन यापुढे कोणी राष्ट्रगीताचा असा अवमान करणार नाही. ही फार गंभीर बाब आहे. आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी व प्रसिध्दी मिळवण्यासाठी कुणी असे अजिबात करू नये.    - अनिकेत तेजवानी