दिशाचा ‘कुंग फू योगा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 01:39 IST
टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड मॉडेल तथा अभिनेत्री दिशा पाटनी सध्या जॅकी चैनसोबत ‘कुंग फू योगा’ या चित्रपटात काम करीत आहे.
दिशाचा ‘कुंग फू योगा’
आइसलॅँड येथे सुरू असलेल्या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये ती ऋतिकच्या एका गाण्यावर जॅकीसोबत डान्स करताना बघावयास मिळते. दिशा तिच्यातील डॅशिंग पर्सनालिटीला प्रमोट करण्यासाठीच जॅकीच्या अॅक्शन चित्रपटात काम करीत असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. टायगर श्रॉफमुळे ती बॉलीवुडमध्ये चांगलीच चर्चेत आहे.