‘रॉकेट सिंग : सेल्समॅन आॅफ द इअर’ या चित्रपटातील नायक हरप्रीत सिंग (रनबीर कपूर) काम्प्युटर कंपनीमध्ये काम करीत असताना नव्या संधी शोधून यशस्वी होतो. ही केवळ एका सिनेमाची कथा नाही तर आॅनलाईन जगतातील वास्तव आहे. काम्युटर व स्मार्टफोन व आॅनलाईन सर्व्हिसेस आजची गरज झाली आहे. हिशेब करण्यापासून ते थेट पर्यटनस्थळांची व सेवा सुविधांची माहिती मिळविण्यासाठी याचा वापर केला जातोे. यामुळेच आॅनलाईन सेवांच्या दुनियेत नव्या संधी निर्माण होत आहेत. कोणत्याही वस्तूची गरज आॅनलाईनच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याने रोजगारचे नवे क्षेत्र विकसित होत आहे. केवळ शहरापुरते हे क्षेत्र मर्यादित राहणार नसून गावापासून ते थेट महानगरापर्यंत आॅनलाईन क्षेत्रातून नव्या संधी चालत येणार आहेत. तुम्ही कुठेही असला तरी सार जग तुमच्या समोर आॅनलाईनच्या माध्यामातून एकवटणार आहे...
डिजिटल मार्केटिंग
नव्या काळातील गरज म्हणून डिजिटल मार्केटिंगकडे पाहिले जात आहे. तुम्ही कोणती वस्तू विकता याला महत्त्व नाही तर ते तुम्ही कोणत्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचविता यावर भर देण्यात येतो. हेच खरे डिजिटल मार्केटिंग. किराणा, धान्य, एवढंच काय औषधेसुद्धा आता आॅनलाईन मिळतात. शोभेच्या वस्तू, दागिने, पुस्तकं, अगदी भाजणी पिठापासून ते घरगुती चकलीपर्यंत काय वाट्टेल ते आॅनलाईन मार्केट करता येऊ शकतं.
वेब/ ग्राफिक डिझायनर्स
वेब डिझायनिंग या क्षेत्राचा विकास आॅनलाईनच्या वाढत्या दराएवढाच वाढत जाणार आहे. डिजिटल जगातील काम जितके वाढेल, लोक जितका आॅनलाइन संवाद आणि व्यवहार साधतील तितकं वेब डिझायनर्स, ग्राफिक डिझायनर्सचं काम वाढणार आहे. अगदी लोकल पातळीवर, म्हणजे जिल्हा, तालुका स्तरावर काम करणाºयांसाठीही या कामाच्या संधी वाढतील.
पीआर/ सोशल मीडिया
हल्ली सगळ्यांना आपला सोशल मीडिया प्रेझेन्स हवा असतो. अनेक कंपन्या आपली ब्रॅण्ड इमेज चांगली व्हावी म्हणून आटोकाट प्रयत्न करत पब्लिक रिलेशनवर पैसे खर्च करतात. त्यामुळे ज्यांचं संवाद कौशल्य चांगलं आहे, सोशल मीडियाची नाडी उत्तम कळायला लागली आहे अशांसाठी या साºयाचा उपयोग आता करिअर म्हणून होऊ शकतो.
अॅप डिझायनर्स
आजकाल सर्वांनाच आपल्या फोनमधे वेगवेगळे अॅप हवे असतातच. आणि आपला स्वत:चा अॅप असावा, तो लोकांनी वापरावा असं वाटणाºया व्यक्ती, संस्था, समाजसेवी संस्थाही वाढताहेत. त्यामुळे अॅप डिझायनर्सना नव्या काळात जोरदार संधी आहेत. पण त्यात आता मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन आणि तांत्रिक सफाई यांचीही मागणी वाढते आहे.
प्लंबर/ वेल्डर्स
आॅनलाईनच्या दुनियेत प्लंबर्स व वेल्डर यांचेही विशेष स्थान आहे. येणाºया काळात या कामगारांची डिमांड वाढणार आहे. अगदी घरगुती कामांपासून ते थेट मोठमोठे मॉल्स, मल्टिप्लेक्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मोठ्ठाले फ्लायओव्हर्स या साºयांसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात या कुशल मनुष्यबळाची गरज असणार आहे.
डोमेस्टिक हेल्प
मूल सांभाळण्यापासून घरातले आजीआजोबा सांभाळणं, वृद्धांची-आजारी व्यक्तींची देखभाल, त्यांना नुस्ती सोबत, या साºयासाठी डोमेस्टिक हेल्प अर्थात घरगुती कामात मदतनीस म्हणून सेवा देणाºयांची मागणीही वाढते आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ आज उपलब्ध नाही. त्यामुळे येत्या वर्षात या कामासाठी पैसे तर चांगले मिळतीलच पण त्याला नव्या काळातला प्रोफेशनल अॅप्रोच येण्याचीही आशा आहे
डिस्ट्रिक डायरी येईल मदतील
आनॅलाईन सेवा पुरविणारे व मिळविणारे किंवा ज्यांना आपल्या ग्राहकापर्यंत पोहचायचे आहे अशांसाठी डिस्ट्रिक डायरी (डिजिटल डायरी) फायदेशीर ठरू शकते. यात ग्राहक व विक्रेता दोघेही स्थानिक असतात. यात विक्रेत्याचे एक खास पेज तयार होत असल्याने तो ग्राहकाला आपल्याविषयी संपूर्ण माहिती देऊ शकतो. याशिवाय वस्तूंच्या यादीनुसार एखादी वस्तू कुठे कुठे मिळेल याची माहिती देता येते. विशेष म्हणजे यात सर्वांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जातो. पाश्चिमात्य जगात प्रत्येक गावाच्या स्वतंत्र डिजिटल डायरी आहेत. भारतातही ही संकल्पना आता रुजू होऊ लागलीय.