शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

आजचा दिवस आनंदाचा अन् जबाबदारीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 18:33 IST

आजचा दिवस आनंदाचा अन् जबाबदारीचा

जीवनात आनंद पेरा!जागतिक आनंद दिन कवियत्री शांता शेळके यांचे ‘आनंदी आनंद गडे’ हे बालगीत आनंदाचे गीत मानले जाते. लहान मुलांऐवढाच आनंद मोठ्यांना देखील हे गीत ऐकल्यावर होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदांचे क्षण मिळविण्यासाठी अनेक लोक धडपड करीत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघ विविध कार्यक्रम राबवित आहे. शांततेसाठी लोकांमध्ये सुख व समाधानाची वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे. गरिबी निर्मूलन, साक्षरतेचा प्रसार, शास्वत विकास व शांतीसाठी केले जाणाºया प्रयत्नातून संपूर्ण जगात आनंद साजरा केला जाऊ शकतो हा या मागील उद्देश आहे. 2013 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने 20 मार्च हा दिवस आनंद दिन म्हणून पाळला जावा असे जाहीर करण्यात आले. या दिवशी नागरिकांनी आपल्या आसपास असणाºया व्यक्तींना अधिकाधिक चांगले जीवन जगता यावे यासाठी प्रेरीत क रावे असा हेतू ठेवण्यात आला आहे. सर्वांच्या जीवनात हास्य फुलविण्याचा प्रयत्न म्हणजे आनंद दिवस होय. चिवचिवाट कमी होतोय...!जागतिक चिमणी दिवस  जगातील लुप्त होत चाललेल्या पक्षांच्या प्रजातींमध्ये चिमणी चौथ्या स्थानावर पोहाचली आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी घराच्या खिडकीत किंवा सिलिंग फॅनवर घरटे करणारी चिमणी घरचाच भाग असल्याचे वाटत होते. चिमणी मानवी वस्तीतील निसर्ग सफाई कामगार आहे. ज्या घरात चिमण्यांचे घरटे असते तेथे सामन्यात: कि टक वावरत नाहीत. चिमण्याची कमी होणारी संख्या ही चिंतेचा भाग बनला आहे. या प्रजातीचे संरक्षण व्हावे यासाठी जागतिक चिमणी दिवस पाळला जातो. या दिवशी चिमण्याची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करावा.आता उन्हाळा लागतोय. पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या गच्चीवर, बाल्कनीमध्ये, किंवा अंगणात पाणी ठेवता येईल. प्राण्यांसाठी घराभोवतालच्या मोकळ्या जागेत, पदपथाच्या कोपºयात, किंवा आसपासच्या मोकळ्या मैदानाच्या जागेत, एखाद्या झाडाखाली पाणी ठेवता येईल. शक्य असेल तर पक्ष्यांना व प्राण्यांना तेथे त्यांचे खाद्यही ठेवता येईल. घरातील मुठभर धान्य ठेवले तर कित्येक पक्षांची भूक भागवता येते.तासभर बंद करा अनावश्यक दिवेअर्थ अवर डेग्लोबल वॉर्मिंगविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण जगभरात ‘अर्थ अवर डे’ साजरा केला जातो. या दिवशी कमीत कमी विजेचा वापर करण्याचा संदेश दिला जातो. 19 ते 28 मार्च असे दहा दिवस ‘अर्थ अवर’ पाळला जातो हे विशेष. त्यानिमित्ताने रात्री 8.30 ते 9.30 या एका तासासाठी जगभरातील अनावश्यक दिवे बंद ठेवण्यात येणार आहेत. ‘वर्ल्डवाईड फंड फॉर नेचर’ या संस्थेतर्फे दरवर्षी ‘अर्थ अवर’चे आयोजन केले जाते. ‘अर्थ अवर’ची मोहीम 2007 साली सुरू झाली तेव्हापासून जगभरातील 7000 शहरांमधून आणि 154 देशांमधून ती प्रभावीपणे राबवली जाते आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाशी संबंधित अनेक समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना आखणे, त्यासाठी निधी गोळा करणे असे हे काम सुरू आहे. भारतात शनिवारी 19 मार्च रोजी अर्थ अवर पाळण्यात आला. मात्र अर्थ अवर दहा दिवस चालणार असून तो पुन्हा पाळता येऊ शकतो. ऊर्जा बचत आणि पर्यावरणाचा ºहास टाळणे ही आपली जबाबदारी आहे.  ब्रंह्मांडाची निर्मिती, विज्ञान व अंतरिक्ष एक्स्ट्राटेर्रिस्टेरील अब्डुक्शन डे (जागतिक उपरा अपहरण दिवस)पृथ्वीशिवाय ब्रह्मांडात अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे की नाही, याचा शोध गेली अनेक वर्षे सुरू आहे. पण शास्त्रज्ञांना अजून तरी याचे ठोस पुरावे आढळलेले नाहीत. मंगळावर जीवसृष्टी असावी असे मानले गेले. त्यादृष्टीने संशोधनही सुरू आहे. पण तिथे अजूनही जीवसृष्टी असल्याचे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पृथ्वीप्रमाणे जीवसृष्टी असलेला अन्य ग्रह उभ्या ब्रह्मांडात कसा काय नाही याचे आश्चर्य आता शास्त्रज्ञांना वाटू लागले आहे. या ब्रंह्मांडात आपण एकटेच नाही तर परग्रही जीव आपल्याहून प्रगत आहेत व ते एक दिवस पृथ्वीला काबिज करणार आहेत, असेही काही लोक सांगत असतात. या विषयावर चर्चा व्हावी, यासाठी 2008 या सालापासून 20 मार्च रोजी जागतिक उपरा अपहरण दिवस पाळला जातो. यामागील संकल्पना शंका उत्पन्न करणारी असली तरी देखील सृष्टी, ब्रंह्मांडाची निर्मिती, विज्ञान व अंतरिक्ष या विषयाकडे मुलांनी उत्सुकतने पाहावे असा यामागील हेतू आहे.