शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

​अणुबॉम्ब स्फोटाखाली उभे राहण्याची यांनी केली होती डेअरिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 19:59 IST

अणुबॉम्ब विस्फोटाचा मानवावर कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी पाच लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत विस्फोट बिंदूच्या ठीक खाली उभे राहण्याचे मान्य केले.

दुसºया महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात अमेरिकेला सोव्हिएत रशिया आपल्यावर अणुहल्ला करणार याची अनाहुत भीती वाटायची. या भीती पोटी अमेरिकेने पन्नास आणि साठच्या दशकात अनेक प्रोजेक्ट हाती घेतले होते. जर समजा सोव्हिएत रशियाने हल्ला केलाच तर तो हाणून पाडण्यासाठी अमेरिकेन जिनी रॉकेटची निर्मिती केली होती.१७०० टन टीएनटी विस्फोटकांच्या शक्तीसम १.७ किलोटनचे अणुबॉम्ब या रॉकेटस्मध्ये होते. परंतु केवळ चाचणी करिता एकदाच त्यांचा वापर झाला. जुलै १९, १९५७ रोजी म्हणजेच ५९ वर्षांपूर्वी ‘जॉन’ या संकेतनामाने ही चाचणी करण्यात आली. नेवाडा चाचणी स्थळ ‘एरिया १०’ वर नॉरथ्रॉप एफ-८९ स्कॉर्पियन जेटद्वारे १८.५ फूट उंचीवरून हे रॉकेट लाँच करण्यात आले. सुमारे ४ किमी अंतर पार केल्यावर हवेतच जमिनीपासून ५.६ किमी उंचीवर त्याचा स्फोट करण्यात आला.यामध्ये सर्वात आश्चर्य वाटण्याची गोष्ट म्हणजे विस्फोटाचा मानवावर कसा परिणाम होतो हे अभ्यासण्यासाठी पाच लोकांनी स्वत:हून पुढाकार घेत विस्फोट बिंदूच्या ठीक खाली उभे राहण्याचे मान्य केले. हे पाच लोक म्हणजे कर्नल सिडनी ब्रुस, लेफ्ट. कर्नल फ्रँक पी. बॉल,  मेजर नॉर्मन बॉडिंजर, मेजर जॉन ह्युज् आणि डॉन लुट्रेल.त्यावेळच्या विज्ञानानसुार या लोकांना गंभीर अशी हानी पोहचणार नाही असे गृहीत धरण्यात आले. परंतु आज आपल्याला माहित असलेले किरणोत्सर्गाचे दूष्परिणाम त्याकाळी माहित नव्हते. या पाचही जणांना वयाच्या चाळीशी किंवा पन्नाशीत कर्करोगाने ग्रासले. ब्रुस, बॉल, बॉडिंजर आणि ह्युज् या सगळ्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. लुट्रेलला मोठ्या आतड्याचा कॅन्सर झाला.सहभागी झालेल्या सर्वांनाच कॅन्सर होणे याला काही योगायोग म्हणता येणार नाही. पाचपैकी बरेच जण अनेक अणुचाचण्यांमध्ये सहभागी झालेले होते. ‘पार्शियल न्युक्लियर टेस्ट बॅन ट्रिटी’द्वारे १९६३ पासून हवेत अणुचाचण्या करण्यावर बंदी घालण्यात आली.