शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

​‘कपिंग’ची क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 18:38 IST

प्राचीन काळापासून चालत आलेली ही थेरपी आॅलिम्पिकच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अखेर काय आहे कपिंग?

जगातील सर्वोत्तम आॅलिम्पिक खेळाडू म्हणून गणल्या जाणाऱ्या मायकेल फेल्प्सने यंदाच्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके पटकावून आपले श्रेष्ठत्व कायम ठेवले. त्याच्या या भीम पराक्रमाचे जगभरात गोडवे गायले जात आहेत. या कौतुकवर्षावात सर्वाधिक चर्चा झाली ती त्याच्या खांद्यावरील जांभळ्या रंगाच्या डागांची.ते डाग काही जखमेचे नव्हते तर ते ‘कपिंग’ नावाच्या थेरपीचे होते. काय आहे ही कपिंग थेरपी, तिचा उपयोग काय याविषयी माहिती देणारे हे फीचर.कपिंग थेरपीकपिंग हा प्रामुख्याने अ‍ॅक्युपंक्चर थेरपीचा एक प्रकार आहे. प्राचीन काळापासून चीन आणि इजिप्तमध्ये तो वापरण्यात येतो. शरीरावर विशिष्ट जागी गरम ग्लास किंवा कप ठेवून निर्वाताद्वारे (व्हॅक्युम) त्या जागी रक्तपुरवठा वाढवण्यात येतो. त्यामुळे जागेवरील त्रास कमी होण्यास मदत होते. आजकाल जगभरात ‘कपिंग’चा ट्रेण्ड पसरला असून अधिकाधिक लोक आपल्या शारीरिक व स्नायूवेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘कपिंग’ थेरपीचा वापर करू लागले आहेत.अशी केली जाते ‘कपिंग’त्वचेवर ज्या ठिकाणी वेदना आहेत किंवा ज्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढवायचा आहे अशा ठिकाणी गरम काचेचा ग्लास किंवा कप उलट करून ठेवतात. त्यामध्ये मंद ज्योत पेटवतात ज्यामुळे ग्लासमधील उरलेला आॅक्सिजन संपून पूर्णपणे निर्वात (व्हॅक्युम) निर्माण होतो. व्हॅक्युममुळे त्या ठिकाणी रक्तपुरवठा खेचला जातो. पाच ते दहा मिनिटे हे कप्स त्वचेवर ठेवले जातात. रक्तपुरवठा वाढल्याने त्या जागी लाल-जांभळ्या रंगाचे डाग दिसू लागतात. परंतु घाबरण्याचे कारण नाही. तीन-चार दिवसांत ते निघून जातात.कपिंगचे फायदेया थेरपीचा उपयोग करणारे मानतात की, स्नायू वेदना, वेदनाशमन, संधिवात, निद्रानाश आणि फर्टिलिटी समस्यांवर कपिंगमुळे लाभ होतो. कपिंगचा मूळ उद्देश म्हणजे शरीरातील ऊर्जा प्रवाहाला दिशा देऊन संपूर्ण शरीरात तिचे योग्य संतुलन राखणे हा आहे. मायकेल फेल्प्स आणि इतर अ‍ॅथलिट त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी कपिंग थेरपीचा वापर करतात. मसाज आणि इतर उपचारपद्धतींपेक्षा कपिंग उत्तम आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सामान्य लोकांनादेखील कपिंगमुळे खूप लाभ होऊ शकतो. असं म्हणतात की, यामुळे व्यक्तीमध्ये नवचेतना निर्माण होते. स्नायूच्या वेदना, आकुंचन, मायग्रेन यासारख्या त्रासांपासून जलद आराम मिळतो. विज्ञान काय म्हणते?फार पूर्वीपासून जरी ही थेरपी अस्तित्वात असली तरी त्यापासून होणाºया लाभांना कोणताच वैद्यक शास्त्रीय पुरावा नाही. कित्येक नामवंत तज्ज्ञ मानतात की, कपिंग केवळ ‘फॅड’ असून त्यापासून कोणताच विशेष असा फायदा होत नाही. कपिंगमुळे स्नायूंच्या वेदनेवर कदाचित तात्पुरता आराम मिळेल परंतु दीर्घकाळासाठी या थेरपीचा कसा परिणाम होतो याविषयी पुरेशी वैज्ञानिक माहिती सध्या उपलब्ध नाही.  काही क्रीडा तज्ज्ञ म्हणतात की, खेळाडूंना कपिंगमुळे केवळ मानसिक समाधान मिळते. यापेक्षा दुसरा काही याचा फायदा नाही. त्यामुळे कपिंग करावी की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण कपिंग करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरचा जरूर सल्ला घ्या.कपिंग कोणी करू नये?त्वचेचे आजार : तुमची त्वचा जर अतिशय संवेदनशील किंवा सोरायसिस, इसब किंवा इतर त्वचेच्या समस्या असतील कपिंग करणे टाळण्याचा तज्ज्ञ सल्ला देतात.हृदयविकाराचे रुग्ण : हार्ट पेशंटस्नी तर कपिंग करू नयेच. पेसमेकर बसवलेले असेल तर त्या व्यक्तीचे रक्त खूप पातळ असते. अशा लोकांनी या थेरपीचा वापर टाळावा.पाठ व कण्याची समस्या : ज्या लोकांना तीव्र पाठदुखी असेल किंवा पाठीच्या कण्याची समस्या असेल कपिंगमुळे ती आणखी बिघडण्याची शक्यता असते.कपिंग सेलिब्रिटीकेवळ अ‍ॅथलिटस् आणि खेळाडूंमध्येच कपिंगची क्रेझ आहे असे नाही. अनेक हॉलीवूड सेलिब्रिटिज कपिंग करत असतात. ग्वेनेथ पॅल्ट्रो, जेनिफर अ‍ॅनिस्टन, जस्टिन बीबर, व्हिक्टोरिया बेकहॅम, डेनिज रिचर्डस् अशा अनेक सेलिब्रेटिंनी कपिंग केलेली आहे. प्रामुख्याने सेलिब्रेटींना असलेली ‘कपिंग’ची भुरळ आता सामान्य लोकांनासुद्धा पडू लागली आहे.