शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

क्लिओपात्रा सुंदर दिसण्यासाठी गुलाबपाणी वापरायची. असं आहे काय या गुलाबपाण्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:30 IST

तुमची त्वचा कोरडी असो की तेलकट किंवा मिश्र. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी गुलाबपाणी उत्तम आहे. अगदी क्लिओपात्राही आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबपाणीच वापरायची.

ठळक मुद्दे* गुलाबपाणी त्वचेस लावलं तर त्वचा ओलसर राहण्यास मदत होते.* मेकअप सेटर म्हणून गुलाबपाणी चांगलं काम करतं.* मेकअप सेट करण्यासाठी जसा गुलाबपाण्याचा उपयोग होतो तसाच मेकअप काढण्यासाठीही गुलाबपाण्याचा उपयोग होतो.

- माधुरी पेठकरसौंदर्याबद्दल जागरूक असाल तर आपल्या घरात गुलाब पाण्याची एक बाटली असायलाच हवी. सौंदर्योपचारात गुलाब पाणी महत्त्वाची भूमिका बजावतं. मग तुमची त्वचा कोरडी असो की तेलकट किंवा मिश्र. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी गुलाबपाणी उत्तम आहे. अगदी क्लिओपात्राही आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबपाणीच वापरायची. क्लिओपात्रा गुलाब पाणी वापरत असेल तर मग नक्कीच गुलाब पाण्यात राम आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

गुलाबपाण्यात असतं काय?

1. गुलाबपाण्यामुळे त्वचेवरील जास्तीचं तेल निघून जातं. त्वचेचा ‘पी एच’ बॅलन्स सुधारतो.2. आग शांत करणारे घटक गुलाबपाण्यात असतात. त्यामुळे त्वचेची आग होत असल्यास गुलाब पाणी वापरल्यास आराम मिळतो. त्वचा लाल होवून सूज येत असेल , जळजळ होत असेल किंवा गजकर्ण सारख्या त्वचेच्या विकारातही गुलाबपाणी उत्तम उपायकारक ठरतं.3. गुलाबपाणी त्वचेस लावलं तर त्वचा ओलसर राहण्यास मदत होते. त्वचा पुर्नज्जिवित होते. त्वचेवर नवचैतन्य येतं.4. गुलाबपाण्यात अ‍ॅण्टिआॅक्सिडंट घटक असल्यानं त्वचेच्या पेशी बळकट होतात. त्यामुळे त्वचेच आरोग्य सुधारतं.5. गुलाबपाण्यात अ‍ॅस्ट्रीजण्ट सारखे घटक असल्यामुळे गुलाबपाणी लावल्यास त्वचा स्वच्छ होते. त्वचेची मोकळी छिद्र बंद होतात. त्वचेचा टोन सुधारण्यास गुलाबपाण्यामुळे मदत होते.6. गुलाब पाण्याचा सुगंधात मोठी ताकद असते. त्यामुळे मूड सुधारतो. मनातली भिती जाते. छान वाटण्यास मदत होते.7. गुलाबपाण्यात पोषणाची क्षमता उत्तम असते. त्यामुळेच केसांच्या आरोग्यासाठी गुलाबपाणी उपयुक्त असते. केसांच्या मुळांशी कोंड्यामुळे आग होत असेल तर ही आग शमवण्याच काम गुलाबपाणी करतं.8.रात्री शांत आणि चांगली झोप येण्यासाठी, झोपेच्या वेळेस प्रसन्न वाटण्यासाठी उशीवर गुलाबपाणी शिंपडावं.9. गुलाबपाण्यामुळे त्वचेवर वयाच्या खुणा दिसत नाहीत.सौंदर्यासाठी गुलाबपाणी1 मेकअप सेटर म्हणून गुलाबपाणी चांगलं काम करतं. मेकअपआधी चेहेरा धुवून झाल्यावर गुलाबपाणी चेहेºयास लावावं. ते दोन तीन मीनिटं वाळून द्यावं आणि मग मेकअप करावा. यामुळे चेहे-यावर मेकअप चांगला बसतो.2. कोरड्या केसांसाठी समप्रमाणात गुलाबपाणी आणि ग्लिसरीन घ्यावं. हे मिश्रण केसांच्या मुळाशी मसाज करून लावावं. ते अर्धा तास तसंच केसात मुरू द्यावं आणि नंतर शाम्पूनं केस धुवावेत.3. गुलाबपाणी क्लीन्जर म्हणून काम करतं. फेस वॉशनं चेहेरा धुतल्यानंतर एक चमचा गुलाबपाण्यात काही थेंब ग्लिसरीन मिसळून ते मिश्रण चेहे-यास लावावं.4. डोळांचा थकवा घालवण्यासाठी कापसाचा बोळा गुलाबपाण्यात बुडवून ते बोळे डोळ्यावर काही वेळ ठेवावे. त्यामुळे डोळ्यास आराम मिळतो. डोळ्यांची जळजळ थांबते. आणि डोळ्यांखाली आलेली सूजही कमी होते.5. केसांना शाम्पू केल्यानंतर केस धुताना शेवटी एक कप गुलाबपाणी केसांवर घालावं. यामुळे केसांना चमक येते.6. चेहे-यावरील डाग घालवण्यासाठी एक चमचा लिंबू रस, एक चमचा गुलाब पाणी घ्यावं आणि ते चेहे-यास लावावं. अर्धा तासानं चेहेरा पाण्यानं धुवावा.7 . मेकअप सेट करण्यासाठी जसा गुलाबपाण्याचा उपयोग होतो तसाच मेकअप काढण्यासाठीही गुलाबपाण्याचा उपयोग होतो. यासाठी गुलाबपाण्यात थोडे नारळाच्या तेलाचे थेंब टाकावे. आणि ते मिश्रण चेहे-यास लावावं. या मिश्रणाचा उपयोग त्वचेचं आरोग्य सुधारण्यास होतो.8. दोन चमचे बेसन पीठ , त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण गुलाबपाण्यानं भिजवून त्याचा लेप करावा. आणि तो चेहे-यास लावावा. पंधरा मीनिटांनी लेप धुवून टाकावा. यामुळे चेहे-यास आलेला काळेपणा निघून जातो.