क्लिंटन यांना थॉमस डॉड पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:46 IST
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार आणि न्यायाच्या क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांना थॉमस डॉड या पुरस्काराने गौरवण्यात आले.
क्लिंटन यांना थॉमस डॉड पुरस्कार
क्लिंटन यांच्यासह सेनेगलमध्ये मानवाधिकारावर कार्य करणार्या 'टॉस्टन' या संघटनेलाही हा पुरस्कार विभागून देण्यात आला. 'जगभरात दहशतवादी घटना वाढत असताना तसेच अल्पसंख्यावर सर्वत्र अन्याय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मानवाधिकाराच्या क्षेत्रात लक्षणीय काम होत आहे. मानवाधिकाराच्या क्षेत्रात सुरू असलेल्या कार्यामुळे युद्ध, मानव तस्करी आणि इतर अमानवी कृत्ये कमी होतील,' असा आशावाद क्लिंटन यांनी यावेळी व्यक्त केला.