शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

पदरावरती कुंदन, मोती खड्यांचा ‘साडी ब्रोच’ फॅशनेबल हवा! -साडीला फॅशनेबल करण्याचा एक नवा ट्रेण्ड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 14:55 IST

सध्या ‘साडी ब्रोच हा साडीला आणखी डिझायनर लूक देणारा प्रकार खूप लोकप्रिय होत आहे. हा ब्रोच म्हणजे साडीपिन नाही बरं का ! साडी पल्लू ब्रोच आहे हा!

ठळक मुद्दे* काठपदर किंवा डिझायनर साडी अशा दोनही प्रकारच्या साड्यांवर हा ब्रोच लावता येतो.*या ब्रोचमुळे खांद्यावर सुंदर ब्रोच आणि खाली पदरावर साखळ्यांचा सुंदर पदर म्हणा किंवा एक डिझायनर लेयर तयार होतो.* ब्रोचचा हा प्रकार केवळ साडीवरच शोभून दिसतो असं नाही तर वनपीस गाऊनवरही तो सुंदर दिसतो. तसेच डिझायनर कुर्तीवर, फेस्टिव्हल पोशाखावर देखील उठून दिसतो.

सारिका पूरकर-गुजराथीश्रावण सुरु झालाय.निसर्ग हिरवाईनं नटला आहे. सणवार सुरु झाले आहेत. त्यामुळे महिलावर्गात विशेष उत्साह पुढील महिनाभर असणार आहे. कारण त्यांच्या हक्काचा, नटण्या-मुरडण्याचा महिना सुरु झाला आहे ना ! मंगळागौर, श्रावणी शुक्र वार, जिवतीची सवाष्ण अशा अनेक कारणांसाठी महिलांना छान नटून-थटून मिरवता येणार आहे. तर अशा या श्रावणात मंगळागौर, हळदीकुंकू समारंभासाठी छान काठपदर किंवा डिझायनर साडी घालून तुमचा रु बाब, तोरा दाखवायचा असेल तर तीच ती ज्वेलरी किंवा तोच तो लूक टाळा. काय करु मग? असं म्हणताय? डोण्ट वरी. तुमच्या मदतीला आले आहेत साडी ब्रोच. होय, सध्या साडी ब्रोच हा साडीला आणखी डिझायनर लूक देणारा प्रकार खूप लोकप्रिय होत आहे. हा ब्रोच म्हणजे साडीपिन नाही बरं का ! साडी पल्लू ब्रोच आहे हा!

 

 

कसा असतो नेमका हा साडी पल्लू ब्रोचकाठपदर किंवा डिझायनर साडी अशा दोनही प्रकारच्या साड्यांवर हा ब्रोच लावता येतो. काही वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीचा हिरव्या साडीतला एक फोटो प्रसिद्ध झाला होता. त्यात तिनं हा ब्रोच घातला होता. त्यानंतर सोनम कपूर हिनं देखील हा ब्रोच साडीवर घातला होता कुंदन आणि खडे , मोती वापरून तयार केलेल्या ब्रोचच्या खूप आकर्षक डिझाईन्स सध्या पाहायला मिळत आहेत. पदर, कमरेचा भाग या ठिकाणी ब्रोचच्या डिझाईनचा भाग येतो. त्याखाली मग मेटलच्या अत्यंत सुंदर, स्टायलिश साखळ्या लावलेल्या असतात. या साखळ्यांमुळे हा ब्रोच साडीला हटके लूक देतो.

 

ब्रोच कसा वापरायचा?

कंबरपटट्याला जशा साखळ्या असतात तसाच साखळ्या असलेला हा चेन ब्रोच साडीचा पदर पिनअप करतात त्या भागावर लावायचा असतो. समजा डाव्या खांद्यावर पदर पिनअप करत असाल तर तेथे पदरावर तो लावल्यानंतर त्याच्या खालच्या साखळ्यांचा भाग साडीचा पदर घेतो त्याप्रमाणेच उजवीकडे वळवून मागे हूकने अडकविला जातो. या ब्रोचमुळे खांद्यावर सुंदर ब्रोच आणि खाली पदरावर साखळ्यांचा सुंदर पदर म्हणा किंवा एक डिझायनर लेयर तयार होतो. त्यामुळे अगदी शाही लूक मिळतो साडीला. गुजराती पदर घेताना फक्त डाव्याऐवजी उजव्या खांदयावर ब्रोच लावला जातो. हाच ब्रोच आणखी वेगळ्या पद्धतीनं लावायचा असल्यास तो डाव्या खांद्यावर लावल्यानंतर उजवीकडून डावीकडे वळवत पुढे आणायचा आणि पुढे साडीपिन लावतो तेथे एक भाग अडकवायचा. खांद्यावर अडकवल्यानंतर हाच ब्रोच तुम्ही तुमच्या पदरावर न लावता हातावरून घेऊन मागे अडकवला तर आणखी हटके लूक मिळतो. दरवेळेस या ब्रोचच्या साखळ्या लांबच असतात असं नाही तर शॉर्ट ब्रोच देखील वापरता येतो. खांद्याच्या थोडे खालच्या भागावर अडकवून खालचा भाग पदराच्या मध्यभागी ( कमरेच्या वर ) लावल्यासही छान लूक मिळतो.

कुर्तीजसाठीही ब्रोचब्रोचचा हा प्रकार केवळ साडीवरच शोभून दिसतो असं नाही तर वनपीस गाऊनवरही तो सुंदर दिसतो. तसेच डिझायनर कुर्तीवर, फेस्टिव्हल पोशाखावर देखील उठून दिसतो. आता तर जीन्स कुर्ती, शिफॉनची प्लेन कुर्ती यावर देखील असेच परंतु थोडे शॉर्ट पॅटर्न तसेच काहीसे बोल्ड लूक देणारे ब्रोच देखील लावण्याचा ट्रेण्ड आहे. कुर्तीजवर लावायचे ब्रोच हे मोठ्या आकारातील डिझाईन्सचे तसेच त्यासोबत असणार्या या साखळ्याही थोड्या जाड असतात यामुळेच कुर्तीजचा लूक हटके दिसतो.