जेनर झाला महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:38 IST
लिंग परिवर्तनच्या अगोदर ब्रुस जेनर या नावाने चर्चेत अ...
जेनर झाला महिला
लिंग परिवर्तनच्या अगोदर ब्रुस जेनर या नावाने चर्चेत असलेला रिअँलिटी टीव्ही स्टार कैटलिन जेनर याला लॉस एंजिलिस येथील काउंटी सुपिरिअर कोर्टाने महिला घोषित केले आहे. जेनरने १५ सप्टेंबर रोजी लिंग आणि नावात बदल करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. निकालाच्या दिवशी जेनर न्यायालयात हजर नव्हता. केवळ कागदपत्रांच्या आधारे हा निकाल देण्यात आला. जेनरच्या मते लिंग परिवर्तन करण्यासाठी काही लोकांनी त्याचे सर्मथन केले आहे.