शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

​बिन पाण्याचे ‘टॉयलेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 20:54 IST

विनोद अँथनी थॉमस नावाच्या विद्यार्थ्यांनं पाण्याचा वापर करण्याची गरज नसलेल्या टॉयलेटची संकल्पना विकसित केली आहे.

कधी रेल्वेतून प्रवास केला आहे? हो? मग तुम्हाला चांगलेच माहित असले की, रेल्वेमधील टॉयलेट्सची अवस्था कशी असते. अस्वच्छ, दुर्गंधीपूर्ण अशी विशेषणेदेखीत तोडकी पडावी अशी परिस्थिती भारतीय रेल्वेतील ‘स्वच्छतागृहां’ची आहे. परंतु लवकरच हे चित्र बदलू शकते.कारण विनोद अँथनी थॉमस नावाच्या विद्यार्थ्यांनं ‘वॉटरलेस टॉयलेट’ म्हणजेचे पाण्याचा वापर करण्याची गरज नसलेल्या टॉयलेटची संकल्पना विकसित केली आहे. भारतीय रेल्वेसाठी अशा प्रकारची टॉयलेट्स डिझाईन करण्याच्या खुल्या स्पर्धेत त्याच्या आराखड्याला ७५ हजार रुपयांचा द्वितीत पुरस्कारदेखील मिळाला आहे.लखनऊमधील रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स आर्गनायझेशनतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत ‘पाण्याचा वापर न करता स्वच्छ आणि कसल्याही प्रकारची दुर्गंधी न येणारे टॉयलेट’ डिझाईन करायचे होते. त्यानुसार देशातील अनेक कुशल आणि इनोव्हेटिव्ह तरुणांनी आपापले डिझाईन्स सादर केले.मनिपाल युनिव्हर्सिटीच्या ‘फॅकल्टी आॅफ आर्किटेक्चर’मध्ये (एफओए) विनोद दहाव्या सेमिस्टरचा विद्यार्थी आहे. त्याने बनवलेल्या डिझाईनमध्ये हवाबंद पॉकेटमधून सर्व मल एका कन्वेयर बेल्टद्वारे मोठ्या स्टोरेजमध्ये जमा होण्याची सुविधा असणार आहे. मॅन्युयल क्रॅन्क व्हीलद्वारे ही सर्व प्रक्रीया केली जाणार असून स्टोरेजची निर्मिती अशा पद्धतीने केली आहे की, डिकंपोझिशन व बाष्पीभवनामुळे पाण्याचा अपव्यव कमी होईल.विनोद सांगतो, ‘आताच्या घडीला रेल्वे टॉयलेट्समध्ये मलाची विल्हेवाट थेट रेल्वेपटरीवर केली जाते. मलव्यवस्थापनाची ही पद्धत अतियश घाणेरडी, आरोग्याला हानिकारक, अनैतिक आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणारी आहे. तसेच सध्या वापरात असलेल्या टॉयलेट्समध्ये फ्लशची उत्तम सुविधा नसल्यामुळे मल साचून दुर्गंध पसरतो. माझ्या डिझाईनमुळे पाणी व मनुष्यबळ दोहोंची बचत शक्य आहे.पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ने प्रेरित होऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सादर झालेल्या डिझाईन्समधून रेल्वे, उद्योग, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील तज्ञांनी विजेत्यांची निवड केली. विनोदसह राहूल गर्ग व सौरभ हंस यांच्या टीमलादेखील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.‘वॉटरलेस टॉयलेट्स’मुळे रेल्वेप्रवास अधिक सुखाचा, स्वच्छ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्गंधीरहित होणार याचा आनंद सर्वाधिक आहे. ‘यंग इंडिया’चा चेहरामोहरा बदलण्यासाठी तरुणांनाचा झटावे, झुरावे, झिजावे लागणार. विनोद तर त्याची कल्पकता वापरून त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. आपल्यालाही पुढाकार घ्यावा लागणार आहे. बरोबर ना?