फेरारीच्या किमतीची बेकहॅम ‘वॉच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 03:49 IST
पॅटेक फिलिपी सिलेस्टियल’ नावाची ही घडी फेरारी लक्झरी स्पोर्ट्स कारच्या किंमतीची आहे.
फेरारीच्या किमतीची बेकहॅम ‘वॉच’
‘मॅन यू’चा स्टार प्लेयर आणि ग्लोबल फॅशन आयकॉन डेव्हिड बेकहॅमचे महागड्या घड्यांप्रती असणारे प्रेम सर्वश्रुत आहे. एवढ्या वर्षांत त्याने जबरदस्त कलेक्शन जमवले आहे.नुकतेच लंडनमधील फिलिप्स गॅलरीमध्ये पार पडलेल्या लिलावात त्याने परिधान केलेली घडी त्याच्या वैयक्तिक कलेक्शनमधील सर्वोत्कृष्ट घडी असेल.‘पॅटेक फिलिपी सिलेस्टियल’ नावाची ही घडी फार स्पेशल आहे. प्लॅटेनियम केस आणि अद्वितीय असा ‘अॅस्ट्रोनॉमिकल डिस्प्ले’ असणाऱ्या या घडीची किंमत ऐकू न कोणीही चक्रावून जाईल. एक फेरारी लक्झरी स्पोर्ट्स कारच्या किंमतीची ही वॉच आहे.आता एवढे महाग असण्याचे कारण काय? याची दोन कारणे आहेत. पहिले तर ‘पॅटेक फिलिपी’ बँ्रड आणि दुसरे म्हणजे या घडीमध्ये रात्रीच्या आकाशातील घडामोडी (स्काय मुव्हमेंट) दर्शविण्यासाठी विशिष्ट अशी आकाशी प्लेट (सफायर प्लेट) वापरण्यात आली आहे.ही स्काय मुव्हमेंट इतकी सुक्ष्म आणि जटिल असते की ती होण्यासाठी कित्येक महिने लागतात. ती दिसणे खूप दुर्मिळ बाब असते. जिनिव्हा शहरातून चंद्राच्या कला कशा दिसणार याचीदेखील माहिती सेस्टियल घड्याळ देते.बेकहॅमने अशी महागडी घडी घालण्याचे औचित्यदेखील एकदम योग्य निवडले. सामाजिक कार्यासाठी निधी उभारण्यासाठी अॅनी लिबोव्हिट्झ या छायाचित्रकाराने काढलेल्या बेकहॅमच्या फोटोंचा लिलाव करण्यात आला. या चॅरिटी लिलावातून जमा होणारी रक्कम ‘7 : द डेव्हिड बेकहॅम युनिसेफ फाऊंडेशन’ आणि ‘पॉसिटिव्ह व्यूव फाऊंडेशन’ला प्रदान करण्यात येणार आहे.