शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

​प्रिन्सच्या कपड्यांचा १.३४ कोटींमध्ये लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 19:18 IST

प्रिन्सचा ‘पर्पल रेन’ ड्रेसचा सुमोर दोन लाख डॉलर्समध्ये (१.३४ कोटी रु.) लिलाव झाला.

रॉकस्टार प्रिन्सच्या निधनानंतर त्याच्याशी निगडित वस्तूंना चाहते हातोहात खरेदी करतान दिसत आहेत. आपल्या लाडक्या गायकाच्या आठवणी जवळ बाळगण्यासाठी चाहते वाटेल ते किंमत मोजण्यास तयार आहेत. आता हेच पाहा ना. प्रिन्सचा ‘पर्पल रेन’ ड्रेसचा सुमोर दोन लाख डॉलर्समध्ये (१.३४ कोटी रु.) लिलाव झाला.‘पपर्ल रेन’ या १९८४ साली आलेल्या चित्रपटात त्याने घातलेला पांढरा शर्ट आणि  ब्लॅक अँड व्हाईट जॅकेटसाठी प्रत्येकी ९६ हजार डॉलरची भरमसाठ बोली लागली. लिलावाच्या सुरुवातीला याच शर्टची तीन ते पाच हजार डॉलर तर जॅकेटची सहा ते आठ हजार डॉलर एवढी किमान किंमत ठेवण्यात आली होती.चित्रपटात प्रिन्सने सहअभिनेत्री अपोलोनिया कोटेरोसोबत मोटरसायकल राईड मारताना हा शर्ट घातला होता. एक मेकअप आर्टिस्टला शुटिंगनंतर हा शर्ट देण्यात आला होता. ‘प्रोफाईल्स इन हिस्ट्री’तर्फे करण्यात आलेल्या या लिलावाबाबत सांगतान संस्थापक जो मॅडेलना यांनी सांगितले की, जॅकेटचा लिलाव प्रिन्सच्या निधनापूर्वी एप्रिल महिन्यात करण्यात येणार होता.लिलावात ‘पर्पल रेन’ टूर वर प्रिन्सने घातलेल्या एका शर्टला ३२ हजार डॉलर्स, लव्हसेक्सी (१९८८) टूरमधील बुटासाठी १७,९२० डॉलर्स आणि ‘डायमंड्स अँड पर्ल्स’ म्युझिक व्हिडिओमध्ये घातलेल्या नेकलेसला ८३२० डॉलर्स एवढी किंमत मिळाली. परंतु हे सर्व कोणी खरेदी केले याची माहिती लिलावसंस्थेने जाहीर करण्यास नकार दिला.मागच्या महिन्यात प्रिन्सच्या ‘यलो क्लाऊड’ गिटार अमेरिकन फुटबॉल टीम ‘इंडियानापोलिस कोल्ट्स’चा मालक जिम आयर्से यांनी १.३७ लाख डॉलर्समध्ये (९३ लाख रु.) खरेदी केली होती.