कार्यक्षमता वाढविण्यासाठी विचारा ‘का?’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 04:58 IST
स्वत:ला पाच वेळेस ‘असे का?’ हा प्रश्न विचारला.
कार्यक्षमता वाढविण्यासाठी विचारा ‘का?’
आॅफिसच्या कामातून कुटुंबियांसाठी काही वेळच उरत नाही. कसाबसा रविवारचा एक दिवस भेटतो, तोदेखील झोपेत निघून जातो. मग आयुष्यातील इतर गोष्टींसाठी वेळ कसा काढायचा? यावर तोडगा म्हणजे स्वत:ला एकच प्रश्न - ‘असे का होतेय?’ - पाच वेळेस विचारायचे.चार्लस् डुहिगने त्याच्या ‘स्मार्टर फास्टर बेट’ या नव्या पुस्तकात हा मार्ग सांगितला आहे. तो लिहितो, माझ्या कुटुंबियांसोबत रात्रीचे जेवण घेणे मला का जमत नाही? हा माझ्यासमोर प्रश्न होता. मग मी टोयोटो कंपनीत वापरण्यात येणारी स्ट्रॅटेजी वापरली. स्वत:ला पाच वेळेस ‘असे का?’ हा प्रश्न विचारला.मी कुटुंबियासोबत रात्रीचे जेवण का घेऊ शकत नाही?- उशिरा पर्यंत आॅफिसमध्ये थांबावे लागतेका?- कारण दिवसभरात मी आॅफिस काम संपवू नाही शकलो.का?- कारण मी आॅफिसला उशिरा आलो.का?- सकाळी मुलांना आवरण्यात वेळ गेला. चार्लस् डुहिगअशी सगळी कारणे समोर आल्यावर मग चार्लस्ने रात्रीच मुलांचे सगळे कपडे, दफ्तर रेडी करून ठेवले. त्यामुळे तो वेळेवर आॅफिसमध्ये हजर झाला आणि वेळेत काम संपवून रात्री घरी लवकर पोहचू लागला. प्रॉब्लेम सॉल्व!