शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही मॉर्डन किचनचे चाहते आहात का? मग तुमच्या किचनमध्ये या 4 गोष्टी आहेत का? आवडल्या असतील तर आॅनलाइन मागवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 16:04 IST

किचनच्या मॉडर्न लूकमध्ये भर घालणारे काही भन्नाट प्रकार हे तुमच्या कामास येवू शकतात.

- सारिका पूरकर-गुजराथीस्वयंपाकघरातील चमचा-विळीपासून तर कढई, ताटं-वाट्या, पेले, तांबे, सराटे, झारे, सोलणं, तवे, पोळपाट-लाटणे, पातेली या साऱ्या भांड्यांनी मेकओव्हर केलाय. भरपूर, असंख्य नवनवीन आकार, प्रकारात ती उपलब्ध झाली आहेत. भांडीच नाही तर मिक्सर, ग्लास कूकटॉप, इंडक्शन शेगडी, ओवन, मायक्रोवेव्ह, ंराईस कूकर्स, फूडप्रोसेसर या इलेक्ट्रिक वस्तूंमध्येही अत्याधुनिक सोयी बघायला मिळताहेत. यासोबतच कडधान्यांना मोड आणणारे स्प्राऊट मेकर्स, पॉपकॉर्न फोडणारे पॉपकॉर्न मेकर, सॅलॅड आणि भाज्या कापणारे विविध आकारातील चॉपर्स, फेसाळणारी कॉफी बनवणारे कॉफी मेकर्स, काळीमिरी पूड करणारे पेपर क्रशर, पास्ता-नूडल्स मेकर, लसूण-मिरची क्रशर वगैरे वगैरे.. यादी बरीच लांबलचक आहे. स्वयंपाकघराला २१ व्या शतकाचा साज चढला आहे. साहजिकच प्रत्येक महिलेलाच आपल्या किचनमध्ये ही व्हरायटी हवी असते. एकतर या साधनांमुळे तिचे कष्टही काही प्रमाणात कमी झालेय शिवाय किचनला एक फ्रेश आणि मॉडर्न लूकही मिळाला आहे. किचनच्या या मॉडर्न लूकमध्ये आणखी भर घालणारे काही भन्नाट प्रकार दाखल झाले आहेत ते तुम्हाला माहित आहेत का? हे ही तुमच्या खूप कामास येवू शकतात. बर्ड फोर्कमिठाई, फळांचे तुकडे खाण्यासाठी एरवी टूथपिक किंवा फोर्क वापरतात. स्टीलचे तेच ते फोर्क पाहून कंटाळले असाल तर फूड ग्रेड प्लास्टिकचे फोर्क बाजारात नवीन रुपात दाखल झाले आहेत. हे फोर्क कलरफूल आहेत शिवाय यांचे हॅण्डल म्हणून पक्ष्यांचे आकार आहेत, म्हणून ‘बर्ड फोर्क’ म्हणून ते ओळखले जाताहेत. शिवाय हे फोर्क ठेवण्यासाठी झाडाच्या आकाराचे स्टॅण्डही सोबत आहे. काम झालं की हे फोर्क या स्टॅण्डवर लावून ठेवले की झाडावर बसलेले रंगीबिरंगी पक्षीच आपल्याला दिसतात. डायनिंग टेबलवर हा बर्ड फोर्कचा स्टॅण्ड ठेवला की टेबललाही खूप फ्रेश लूक मिळतो. फोर्कप्रमाणेच कार्टून स्पून्सही आले आहेत. कार्टून कॅरॅक्टरचे हॅण्डल या स्पूनसाठी आहे.

 

          एलईडी ग्लास सध्या एलईडीचा जमाना आहे. मग किचन त्यास अपवाद कसं राहील. आता बाजारात सरबत, पाणी सर्व्ह करण्यासाठी खास एलईडी ग्लास उपलब्ध झाले आहेत. या ग्लासमध्ये पाणी, सरबत ओतले की लगेच त्यातील रंगीत बल्ब पेटतात आणि ग्लास विविध रंगांनी चमकू लागतो. साहजिकच आतील पाणी, सरबत देखील छान रंगीत चमकू लागते. पाणी संपलं की हे बल्बही विझतात. आहे ना मॅजिक. प्लॅस्टिकच्या पारदर्शक ग्लासच्या तळाशी हे दिवे बसवलेले असतात. रात्रीचे विवाहसोहळे, पार्टीज यासाठी हे ग्लास खूप छान पर्याय आहेत.

 

 कॉपर टिफिनतांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. तांब्याच्या अर्कामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. या धातूची आरोग्यासाठीची उपयुक्तता आता पुन्हा नव्याने साऱ्यांच्या लक्षात येऊ लागली आहे. म्हणूनच बाजारात आता तांब्याचे कोटिंग असलेले टिफिन बॉक्स दाखल झाले आहेत. ४-५ तास अन्न गरम ठेवणारे तसेच लिकप्रूफ टिफिन बॉक्स म्हणूनही ते ओळखले जातात. या टिफिनला सर्वोत्तम दर्जाचे तांब्याचे कोटिंग करण्यात आलं आहे. आकारही गोलाकार, चौकोनी नाही तर ओव्हल आणि मोठा आहे. तसेच या टिफिनबरोबर टेबलमॅट, नॅपकिन, काटे-चमचा असा लवाजमाच उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामुळे आॅफिसमध्येही घरच्यासारखे आरामदायी लंच घेणं शक्य होणार आहे. कॉपर टिफिनप्रमाणेच कॉपर थर्मासही आता उपलब्ध झाले आहेत.

 

 

 

 

फ्रूट स्पंज महागडे काचेची तसेच स्टीलची भांडी, डिनर सेट स्वच्छ करण्यासाठी मऊ घासणी किंवा स्पंजचा तुकडा आपण वापरत आलोय. आता या स्पंजच्या घासणीने देखील कलरफूल लूक धारण केलाय. फळांच्या आकारात ही स्पंजची घासणी बाजारात दाखल झालीय. स्ट्रॉबेरी, संत्री, आंबा, मेलन या फळांच्या स्लाईसच्या आकाराची ही घासणी दिसायला सुंदर, कलरफूल तर आहेच शिवाय चांगल्या दर्जाचे स्पंज यात वापरले गेले आहे, जे भांड्यांचे चिकट डाग कमी करण्यासाठी मदत करते. अशा या स्टायलिश स्पंजनं मग भांडी घासतानाही मजा येईल नाही?ही सर्व उत्पादनं बाजारात कुठे मिळतील म्हणून दुकानं धुंडाळत बसण्याची गरज नाही ही सर्व उत्पादनं आॅनलाईनही सहज उपलब्ध आहेत.