शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सुंदर दिसायचं मग कोथिंबीर चेहे-याला लावायलाच हवी !

By madhuri.pethkar | Updated: September 22, 2017 18:58 IST

चेहेरा निस्तेज, मलूल दिसत असेल तर तो फ्रेश करण्याचा मार्ग आपल्या स्वयंपाकघरात सापडतो. मूठभर कोथिंबीर त्वचेचे अनेकप्रश्न चुटकीसरशी सोडवते.

ठळक मुद्दे* चेहे-यावर जर मुरूम, पुटकुळ्या, फोड असतील, ब्लॅकहेडस असतील तर कोथिंबीरचा रस काढून तो चेहे-यास लावल्यास उत्तम फायदा मिळतो.* ओठ काळे असल्यास कोथिंबीर ओठांना रगडून लावल्यास ओठ मऊ होतात आणि काळसरपणाही जातो.* कोथिंबीरच्या लेपामुळे त्वचेला नवेपणा प्राप्त होतो.

 

- माधुरी पेठकरभाजी, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ तेव्हाच चविष्ट होतात जेव्हा त्यांच्यावर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरली जाते. कोथिंबीरमुळे पदार्थाला चव आणि सौंदर्य दोन्ही मिळतं. पण ही कोथिंबीर फक्त यासाठीच भुरभुरली जात नाही. खरंतर अनेक गुणांचा खजिना म्हणजे कोथिंबीर. लोह, क जीवनसत्त्वं, शरीरास आवश्यक असे अ‍ॅण्टिआॅक्सिडंट्स असं सर्व काही कोथिंबीरमध्ये असतं. कोथिंबीर चावून खाल्ल्यानं त्वचेवरचा ताण हलका होतो. त्वचा लवचिक होते. कोथिंबीरमुळे शरीराला अ‍ॅण्टिआॅक्सिडंट मिळतात आणि त्वचेवर सुरकुत्या पडत नाही. कोथिंबीरमध्ये असलेल्या लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी वाढते. उठल्यानंतर रिकाम्यापोटी कोथिंबीरची पानं धुवून चावून खाणं हे आरोग्यदायी असतं.चेहे-यावर जर मुरूम, पुटकुळ्या, फोड असतील, ब्लॅकहेडस असतील तर कोथिंबीरचा रस काढून तो चेहे-यास लावल्यास उत्तम फायदा मिळतो. त्वचेचे अवघड विकारही कोथिंबीरच्या उपयोगानं आटोक्यात येतात. तसेच ओठ काळे असल्यास कोथिंबीर ओठांना रगडून लावल्यास ओठ मऊ होतात आणि काळसरपणाही जातो.कोथिंबीर पोटात गेल्यानं अ‍ॅसिडीटी कमी होते. अ‍ॅसिडीटी कमी झाल्यास अ‍ॅसिडिटीनं होणारे त्वचाविकारही आटोक्यात येतात.त्वचेसाठी कोथिंबीर वापरण्याच्या काही विशेष पध्दती आहेत. याच पध्दतीनं कोथिंबीर वापरल्यास कोथिंबीरमुळे त्वचेचा पोत सुधारून त्वचा निरोगी होते.

 

1. कोथिंबीर आणि कोरफड

ताजी कोथिंबीर वाटून घ्यावी. त्यात कोरफडचा गर घालावा. हे मिश्रण चांगलं एकत्र करावं. आणि ते चेहे-यास लावावं. यामुळे चेहे-यावरील सुरकुत्या निघून जातात.2. कोथिंबीर आणि लिंबाचा रस

वाटलेल्या कोथिंबीरमध्ये थोडा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चेहे-यास लावल्यास मुरूमाचे डाग, फोडांच्या जखमा ब-या होतात. ब्लॅक हेडस जातात. तसेच चेहे-यावरच्या मृतपेशी निघून जातात. या मिश्रणाच्या लेपामुळे त्वचेला नवेपणा प्राप्त होतो.3. कोथिंबीरचा फेस पॅक

कोथिंबीर रगडून घ्यावी. त्यात थोडं दूध, मध आणि लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण लेपासारखं चेहे-यास लावावं. यामुळे त्वचा चमकते, उजळते.4. कोथिंबीर आणि तांदूळ

त्वचेला नवता प्रात्प करून देण्याचं काम कोथिंबीर आणि तांदूळ हे कॉम्बिनेशन करतं. यासाठी तांदूळ वाटून घ्यावेत. त्यात कोथिंबीरचा रस घालावा. आणि तो लेप लावावा. यामुळे चेहे-याच्या स्नायूंना आणि पेशींना आराम मिळतो. त्वचा फ्रेश होते.