शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

तेच ते टॉप्स वापरून बोअर झालात का? मग हे 10 प्रकारचे टॉप्स वापरून बघा. टॉप्स घेण्याचा आणि घालण्याचा कधीच कंटाळा येणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 18:51 IST

एकाच प्रकारचे टॉप्स वापरून बोअर झाला असाल तर टॉप्सचे 10 पर्याय आहेत.. ट्राय तर करा!

- मोहिनी घारपुरे-देशमुखटॉप्सची व्याख्या करायची झाल्यास ‘ आॅल सीझन फॅशन स्टेटमेण्ट’ अशी करता येईल. या टॉप्समध्ये सध्या अनेक प्रकार मिळ्तात. साध्या लूकपासून मॉर्डन-फॅशनेबल लूक कॅरी करायचा असेल तर टॉपशिवाय पर्याय नाही. एकाच प्रकारचे टॉप्स वापरून बोअर झाला असाल तर टॉप्सचे 10 पर्याय आहेत.. ट्राय तर करा!1. ट्यूब टॉपशोल्डरलेस, स्लीव्हलेस असलेले हे टॉप्स खूपच सेक्सी दिसतात. विशेषत: छातीलगत हे टॉप्स अत्यंत फिट असतात. एखाद्या ट्यूबप्रमाणे हे टॉप्स शरीराचा वरचा भाग कव्हर करतात म्हणून त्यांना ट्यूब टॉप्स असं म्हटलं जातं. कॉर्पोरेट लूक कॅरी करताना अनेकदा सूटच्या आतमध्ये एखादा ट्यूब टॉप घालून फॅशन केली जाते.

 

2. क्रॉप  टॉप भरपूर प्रकारात उपलब्ध असलेल्या क्रॉप टॉप्सची खासियत म्हणजे हे टॉप्स पोटाच्या काही इंच वर एवढेच लांब असतात. त्यामुळे ज्यांचं पोट खरोखरीच स्लीम असेल अशांनी एखादातरी क्रॉप  टॉप आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवायलाच हवा.पार्टीसाठी, डेटवर जाताना हे टॉप्स आणि जीन्स एकदम सुंदर लुक देतील. 3. टँक टॉप स्लीव्हलेस आणि विविध प्रकारच्या शोल्डर स्ट्रॅप्स असलेले टॉप्स म्हणजे टँक टॉप्स. हे टॉप्स स्पोर्ट्सवेअर, अंडरगारमेण्ट किंवा कॅज्युअल्स आउटरवेअर म्हणून घालता येतात. यामध्येही अनेक प्रकार आहेत, मात्र विशेषत: स्पगेटी टँक टॉप्स, स्लीव्हलेस आणि हॉल्टर टँक टॉप्सची फार चलती आहे. 4. स्कूप नेक टॉप्स नॉर्मल लेव्हलपेक्षा जास्त खालीपर्यंत गळ्याच्या आकारात वेगळ्या कापडानं हायलाईट केलेले असते किंवा नेट वगैरे लावून अधिक आकर्षक केलेले असते. इनरवर स्कूप नेक डिझाईन केलेला असतो, तो पुढच्या किंवा मागच्या बाजूनंही असू शकतो. याचा लूक एकदम वेगळाच येतो हेच या टॉपचे विशेष. 5. बॅटविंग टॉप हल्ली या प्रकारच्या टॉप्सची खूप चलती आहे. वरच्या बाजूनं काहीसा ढगळ आणि हिप्सपर्यंत येता येता व्यवस्थित फिटींगचा असलेला हा टॉप त्याच्या नावाप्रमाणेच वटवाघूळासारख्या बाह्यांनी आकर्षक ठरतो. हॉट शिफॉन स्लीव्ह्स आणि बॅक पॅटर्नमुळे खूपच वेगळा लुक येतो.

 

6. फ्रॉक स्टाईल टॉप पारंपरिक आणि पाश्चात्य लुकचं मिश्रण म्हणजे हे फ्रॉक स्टाईल टॉप्स. या टॉप्सवर फ्रॉकप्रमाणेच प्रिण्ट्स असतात आणि एकंदरच त्याचा लुक फ्रॉक्स सारखा असतो. हे टॉप्स केप्रिझ, लेगिंग्स, जीन्स यापैकी कशावरही छानच दिसतात. 7. आॅफ शोल्डर टॉप आॅफ शोल्डरची तर हल्ली खूपच फॅशन आहे. एरवी ब्लाऊजमध्ये पहायला मिळणारी ही फॅशन टॉप्समध्येही खूपच सेक्सी लुक देते. ब्रॉड नेक्स आणि खांद्यावरून एका किंवा दोन्हीही बाजूनं काहीसे खाली उतरणारे हे टॉप्स एकदम फॅशनेबल लूक देतात.8. शीअर टॉप्स डिझायनर टॉप्स म्हणून प्रसिद्ध असलेले हे शीअर टॉप्स कॉटनचे असले तरीही त्यावर गळ्यापाशी, बाह्यांना आणि बेसला फुलाफुलांची नक्षी असलेल्या विविध रंगातल्या जाळीदार कापडानं बॉर्डर केलेली असते. 9. पाँचो टॉप्स विशेषत: हवेत गारवा आला की पाँचो टॉप्स घालायला सुरूवात होते. पॉलिस्टर मटेरिअलमधले हे टॉप्स कोणत्याही डिझाईन वा पॅटर्नशिवाय असतात. काहीशा स्थूल मुलींना हे टॉप्स छान दिसतात. क्रेझी लाईन्स आणि कर्व्ही नेक हीच काय ती या टॉप्सची विशेषता.. पण तरीही हे टॉप्स अत्यंत सुंदर दिसतात.

 

 

10. प्रिण्टेड टॉप्स तुम्ही खूप फॅशनेबल नसाल पण तरीही थोडंफार आधुनिक राहाणी तुम्हाला आवडत असेल तर बाजारात मिळणाऱ्या प्रिण्टेड टॉप्सचाही पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरेल. हे टॉप्स छान दिसतात. मात्र काळजी एवढीच घ्या की तुमच्या अंगावर योग्य मापात बसेल असाच टॉप निवडा नाहीतर बरेचदा हे टॉप गबाळे दिसू शकतात.