अनुष्का आणि विराटचा ४० कोटींमुळे ‘ब्रेकअप’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 08:45 IST
अनुष्का आणि विराटच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेक दिवसांपासून रंगविल्या जात आहेत.
अनुष्का आणि विराटचा ४० कोटींमुळे ‘ब्रेकअप’
अनुष्का आणि विराटच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेक दिवसांपासून रंगविल्या जात आहेत. ब्रेकअप का झाला याविषयी वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. कोणी म्हणतय की, विराटने लग्नासाठी विचारल्यामुळे तर कोणी म्हणतय अनुष्काच्या स्वभावामुळे विराटने ब्रेकअप केलाय...मात्र ब्रेकअपचे खरे कारण जरा वेगळेच आहे.बे्रकअपचे खरे कारण आहे ते म्हणजे पैसा. पैशामुळे दोघांचा बे्रकअप झाल्याची धक्कादायक गोष्ट आता समोर आली आहे. अनुष्काच्या एका मित्राने याबाबत खुलासा केल्याने ही गोष्ट समोर आली. विराटने अनुष्काच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटासाठी ४० कोटी लावले आहेत. अनुराग कश्यपच्या या चित्रपटात रणवीर कपूर होता आणि करण जोहर काम करणार होता. मात्र १२० कोटीच्या बजेटच्या या चित्रपटाने सर्वांचीच निराशा केली. विराटने जेव्हा चित्रपटाच्या अपयशाबाबत विचारणा केली तर अनुष्काला राग आला. आणि तिने नातेच तोडले. विराटला नंतर वाटले की आता काय आपले पैसे परत मिळणार नाहीत, पण विराटला अनुष्कासोबत रिलेशन ठेवायचे आहे.