शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

​वयाच्या ७५ व्या वर्षी फुलबॉलपटू पेले करणार तिसरे लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 17:57 IST

एकीकडे युरो कपच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच फुटबॉल जगतात आणखी एक बातमी चर्चेचा विषय ठरली आहे. होय, जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जाणारा ब्राझीलचा नामवंत फुटबॉल खेळाडू पेले हा वयाच्या ७५ व्या वर्षी त्याच्या४२ वर्षीय प्रेयसीसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे .

एकीकडे युरो कपच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच फुटबॉल जगतात आणखी एक बातमी चर्चेचा विषय ठरली आहे. होय, जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जाणारा ब्राझीलचा नामवंत फुटबॉल खेळाडू पेले  हा वयाच्या ७५ व्या वर्षी  त्याच्या४२ वर्षीय प्रेयसीसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. हे पेलेचे तिसरे लग्न असेल.येत्या मंगळवारी पेले त्याची प्रेयसी मार्सिया सीबीली आओकी हिच्यासोबत विवाह करणार आहे. साओ पावलो येथे छोटेखानी समारंभात पेले विवाहबद्ध होणार आहे. मार्सिया ही जपानी आहे. १९८० साली न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा पेलेची मार्सियाबरोबर ओळख झाली होती. पण तेव्हा ते परस्परांच्या प्रेमात पडले नव्हते. महिला व्यावसायिक असलेली ४२ वर्षीय मार्सिया ही २०१२ सालापासून पेलेसोबत विविध कार्यक्रमात उपस्थित राहू लागली होती. यावेळी आपल्याला आयुष्यातील खरे प्रेम मिळाल्याची प्रतिक्रिया पेले याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. पेले याचे यापूर्वी दोन विवाह झाले आहेत. रोसेमेसी चोलबी या पूर्वपत्नीपासून त्याला तीन मुले आहेत. फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये पेलेची गणना होते. ब्राझीलला फुटबॉलचा वर्ल्डकप जिंकून देण्यात पेलेने महत्वाची भूमिका बजावली होती. १३६३ फुटबॉल सामन्यांमध्ये १२८१ गोल केल्याची कामगिरी पेले याच्या नावावर आहे.  }}}}